Monday, May 12, 2025

अग्रलेखसंपादकीय

कळा ज्या लागल्या जीवा...

कळा ज्या लागल्या जीवा...

देशाच्या बहुतेक भागांत आता सरासरीपेक्षा वर जास्त तापमानाची नोंद होत आहे. सामान्य परिभाषेत त्याला उष्णतेची लाट म्हणतात. या मे महिन्यात या उष्णतेच्या लाटेत सामान्य जनजीवन होरपळून निघणार तर आहेच पण पशुपक्षी, वन्य प्राणी आणि कीडे कीटक यांनाही तीव्र उन्हाच्या झळा बसणार आहेत. दरवर्षीच हे होत असते आणि याला नॅचरल फिनॉमिनॉ म्हणतात. पण उत्तर भारत आणि महाराष्ट्राच्या काही भागांत जसे की, मराठवाड्यातील जिल्हे तसेच जळगाव आणि धुळे आदी भागात या दिवसात तीव्र उन्हाने तापनमानाचा पारा कितीतरी जास्त चढलेला असतो. भारतीय हवामान विभागाने जी महिती दिली आहे त्यानुसार हीट वेव्हज् या महिन्यात राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि गुजरात तसेच ओडिशाच्या भागात तसेच उत्तर कर्नाटक या प्रांतात या हीट वेव्हचा अनुभव येईल. आता या उष्णतेच्य लाटेचे कारण सांगता येईल की ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामानातील बदल हेच आहेत.


वाढते जागतिक तापमान आणि ग्रीन हाऊस गॅसेस परिणाम यामुळे वारंवार उष्णतेच्या लाटा येतात. तसेच जी शहरे अधिक दाट वस्तीतील आहेत त्यांना हीट वेव्हचा सामना करावा लागतो असेही कारण सांगितले जाते. या सर्व कारणामुळे मुंबई आणि इतरत्र भारतात हीट वेव्हचा परिणाम जाणवतो असे दिसते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २०२५ हे वर्षे सर्वात हॉट वर्षे असेल असा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीत म्हटले आहे की, २०२४ या वर्षी जितके तापमान होते त्यापेक्षा अधिक तापमान यंदा मार्च ते मे महिन्यात भारतात कित्येक ठिकाणी जाणवेल. उन्हाळा सुरू होताच अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा वर गेलेले दिसते. त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होतो. कमाल तापमानातील वाढ ही सरासरी ६.५ पेक्षा जास्त नोंदवली जाते तिला त्याला उष्णतेची लाट आल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात तर असा काळ आता येत आहे आणि त्याला आपण सर्वांनी ठामपणे सामोरे जायला हवे. जळगाव आणि अन्य जिल्ह्यात, तर उष्म्यामुळे उन्हाचा तडाखा ज्याला सनस्ट्रोक म्हटले जाते त्याचा धोका फार मोठा असतो आणि त्या घटना अटळ आहेत. पण त्यावर उपाय आहेत ते म्हणजे सतत शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवणे, उन्हाच्या तडाख्यात बाहेर न पडणे असे कित्येक उपाय आहेत.

भारतातील पीकपाणी स्थितीवर उष्णतेच्या लाटेचा परिणाम होत आहे. गहू आणि तांदूळ तसेच इतर पिकांवर लक्षणीय परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पिकाचे उत्पादन कमी होण्यावर होतो. पिकाची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होते तसेच फळे, भाज्या आणि पशुधनावर उष्णतेच्या लाटेचा परिणाम होतोच. यंदा उच्च तापमानामुळे दुभत्या जनावरांची काळजी जास्त घ्यावी लागेल. त्यांची तहान भूक कमी होते आणि कित्येक तर जीव सोडतात. भारतात उष्णतेचा ताण आणि अनियमित हवामान यामुळे कृषी उत्पादनात लक्षणीय घट होते आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा घातक परिणाम होत असतो. हाच काळ असतो की जो गहू हंगामाचा असतो. भारतातील हवामान बदलामुळे भारताच्या गव्हाच्या उत्पादनावर गव्हाच्या उत्पादनाचा दर्जा आणि उत्पादनावर व्यापक परिणाम होतो. भारताने यंदाच्या फेब्रुवारीत सर्वाधिक उष्ण महिन्याची नोंद केली आहे. १२५ वर्षांतील हे रेकॉर्ड आहे. हवामान विभागाने मे महिन्यात धोक्याची घंटा वाजवली आहे की, यंदाचा मे महिना हा सर्वाधिक उष्ण महिना असेल. केवळ तापमान वाढ इतक्यापुरताच हा परिमाम नाही, तर एल निनोचा परिणाम भारताच्या कृषी उत्पादनावर होत असतो आणि त्यामुळे हीट वेव्हची दखल घ्यावी लागते. गहू हे भारतातील प्रमुख पीक आहे आणि गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गव्हाने उत्पादनाचा उच्चांक गाठला आहे. यंदा पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यात सरासरीपेक्षा वर तापमान नोंदवले गेल्याने कृषी उत्पादनावरही त्याचा परिणाम होणार आहे. केवळ उन्हाचा तडाखा इतक्यापुरता हा परिणाम मर्यादित नाही तर भारताचे कृषी उत्पादन यावर एल निनोचा परिणाम होणार आहे. परिणामी भारताच्या जीडीपीवर त्याचा परिणाम होणार आहे. गहू हे भारताचे मुख्य पीक आहे. यंदा भारताने ११२.२ दशलक्ष अब्ज टन गहू उत्पादन २०२२ मध्ये नोदवले आहे.



कृषीमध्ये महत्त्वपूर्ण लोकसंख्येचा भाग हा गुंतलेला असतो. त्यामुळे उष्णतेची लाट आणि त्याचा पिकावर परिणाम याचा किती गहिरा परिणाम होणार आहे याचा अंदाज येईल. भारतीय हवामान खात्याने असेही म्हटले आहे की, हीट वेव्हमुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम तितकासा होणार नाही. पण फळभाज्या लागवडीवर त्याचा परिणाम होईल. उष्णतेच्या लाटेचा परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर ही होतो आणि हार्टस्ट्रोक्स आणि डिहायड्रेशनचा धोका असतो. तसेच रोगराई जसे की संसर्गजन्य रोगांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे मानवाने सर्वंकष काळजी घेतली पाहिजे हे त्यावर उत्तर आहे. पाण्याचा पुरवठा, तर ग्रस्त होतोच आणि उन्हाळ्यातच टँकर मुक्त महाराष्ट्राच्या नुसत्या घोषणा झाल्या. पण त्यावर अंमलबजावणी झालीच नाही. टँकर आजही आहेत आणि टँकर लॉबीचे राज्य आहे. उन्हाच्या लाटेत तर त्यान टँकर लांबीवर तर कित्येकांचे साम्राज्य उभे राहिले आहे. त्याला कुणीही धक्का लावू शकलेले नाही. पण उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक परिणाम होतो. तो उत्पादनावर आणि घटलेली व्यावसायिकता यामुळे लोकांचे उत्पन्न कमी होते. हा परिणाम फार मोठा होतो. मुंबईच नव्हे तर अर्धा भारत आज हीट वेव्हच्या तडाख्यात आहे. येत्या काही दिवसांत तो परिणाम वाढत जाणार आहे. त्यामुळे भारतीयांनी दक्ष राहिले पाहिजे आणि सरकार तसेच नागरिकांनीही आपल्याला उष्णतेपासून त्रास होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे.

Comments
Add Comment