
जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील जंगलात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार मारण्यास भारतीय सैन्यांना यश (Indian Army killed Terrorists) आलं आहे. या दहशतवाद्यांपैकी एकाचा पहलगाम हल्ल्यात समावेश असल्याचे म्हंटले जात आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर, जम्मू-काश्मीरमध्ये शोपियानच्या जंगलात मंगळवारी सकाळी काही दहशतवादी दिसून आले होते. दहशतवादी दृष्टीस पडताच भारतीय लष्कराने या परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरु केली. यादरम्यान दहशतवादी आणि भारतीय सैन्य यांमध्ये चकमक झाली. यानंतर भारतीय सैन्याच्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले असल्याचे वृत्त आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याचे समजते.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी ठार
शोपियान जिल्ह्यातील केलर येथील शुकरुच्या जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती शोध पथकाला मिळाली होती. ज्याची खबर मिळताच भारतीय सैन्याने त्या परिसरात वेढा घालत धडक कारवाईला सुरुवात केली. ज्यात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या शाहिद अहमद कुट्टे या दहशतवाद्याचेही नाव समोर येत आहे. तर दूसऱ्या दहशतवाद्याचे नाव अदनान शफी असे आहे, हा दहशतवादी देखील (TRF) शी संबंधित होता.

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान येथील केलर जंगलात सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईदरम्यान चकमक सुरू (Shopian Encounter) झाल्याचे वृत्त आहे. ...