
जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान येथील केलर जंगलात सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईदरम्यान चकमक सुरू (Shopian Encounter) झाल्याचे वृत्त आहे. अहवालानुसार सदर ठिकाणी २ ते ३ दहशतवादी असण्याची शक्यता आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात आज मंगळवारी संशयित दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी शोपियानमध्ये जाण्यापूर्वी सुरुवातीला कुलगाम जिल्ह्यात चकमक सुरू झाली.
दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील शुक्रू केलर जंगलात भागात दहशतवादी लपून बसले असल्याच्या माहिती शोध मोहिम पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे, सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदी आणि शोध मोहीमेला सुरुवात केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी सैन्यांवर गोळीबार केल्याने त्यांना प्रत्युत्तर देताना शोध मोहिमेचे रूपांतर चकमकीत झाल्याची माहिती झाल्याची माहिती, अधिकृत वृत्तसंस्था पीटीआयने दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळीबार सुरू आहे, परंतु अद्याप दोन्ही बाजूंनी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे देखील पीटीआयने म्हटले आहे.