Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्र

जोरदार पावसामुळे साठवणुकीच्या कांद्याचे होणार नुकसान

जोरदार पावसामुळे साठवणुकीच्या कांद्याचे होणार नुकसान

पारनेर : पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील टाकळी ढोकेश्वर,वासुंदे,वडगाव सावताळ आणि तिखोल या गावांमध्ये सोमवारी मध्यरात्री व सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ओढे-नाल्यांना पाणी वाहू लागले.मात्र,या पावसाने साठवणुकीसाठी ठेवलेल्या कांदा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.तालुक्याच्या उत्तर भागात सध्या पावसाचा जोर वाढला असून, कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात साठवणुकीत आहे. पावसामुळे कांद्याला ओल लागून सडण्याची भीती निर्माण झाली आहे.यंदा कांदा उत्पादन चांगले झाले असले,तरी पावसाच्या संकटाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.स्थानिक शेतकरी सांगतात की,कांद्याचे भाव आधीच कमी असताना आता नुकसानीमुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.काही शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना सुरू केल्या आहेत,परंतु सततच्या पावसामुळे त्यांना मर्यादा येत आहेत.कृषी विभागाने शेतकऱ्यांना साठवणुकीसाठी योग्य व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment