
मुंबई : अभिनेता हार्दिक जोशीला 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील अक्षया देवधर आणि हार्दिकने खऱ्या आयुष्यातही एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली.त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचेही भरभरून प्रेम मिळाले. यातच हार्दिक जोशीने पत्नी अक्षयाच्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट दिले आहे. हार्दिकने त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबई : नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य आणि चित्रपट निर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांना रिझवणारे ज्येष्ठ लेखक मधुसूदन कालेलकर यांचा वारसा ...
हार्दिकचा पहिला हिंदी सिनेमा
हार्दिक जोशीच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव 'गुरु-जी' असे आहे. या टीझरमध्ये हार्दिक ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये दिसतं की, हार्दिक जोशी चेहऱ्यावर कापड बांधून समुद्रकिनारी हातात हत्यार घेऊन उभा आहे. त्याच्या समोर गुंडांची एक टोळी उभी आहे. हार्दिक जोशी त्यांना मारतो आणि चांगलाच धडा शिकवतो. त्यानंतर हार्दिकच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला करतो. या टीझरसोबत त्याने पोस्टमध्ये लिहिले की, "प्रत्येक हिरोसोबत त्याला दिशा दाखवणारी एक स्त्री असते. अक्षयाच्या वाढदिवशी मी माझ्या पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर सर्वांसोबत शेअर करत आहे. अक्षया हे तुझ्यासाठी", अशा शब्दात हार्दिकने त्याच्या पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर सर्वांसोबत शेअर केला आहे.
View this post on Instagram
हार्दिकच्या पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर बघताच चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याशिवाय अक्षयालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहते देखील आता हार्दिकचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा आता हिंदी चित्रपटात झळकणार आहे.