‘तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र…

मुंबई : नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य आणि चित्रपट निर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांना रिझवणारे ज्येष्ठ लेखक मधुसूदन कालेलकर यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत त्यांच्या नातीने गौरी कालेलकर-चौधरी आणि तिचे पती सिद्धेश चौधरी यांनी 'मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स' या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. कलासंस्कृतीचे व्रत जोपासणाऱ्या या निर्मिती संस्थेने, संस्थेचे सदस्य परी तेलंग आणि शंतनू तेंडुलकर यांच्या सहकार्याने आणि 'थिएटर ऑन एंटरटेनमेंट' आणि 'पी एस डी जी स्टुडिओज प्रॉडक्शन' यांच्या साथीने “एक तिची गोष्ट” रंगमंचावर आणली आहे.

यंदा ११ मे ला ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ मध्ये झालेल्या शुभारंभाच्या प्रयोगाला नाट्यरसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली “एक तिची गोष्ट” चा पुढील प्रयोग शनिवार १७ मे रोजी पुण्याच्या भारत नाट्य मंदिर येथे रात्रौ ९.३० वा. आणि शनिवार २४ मे रोजी रात्रौ ८.३० वा. श्री शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे.

मनमोहक नृत्य, त्याला अर्थपूर्ण संगीताची आणि उत्तम अभिनय, निवेदनाची जोड मिळाल्यावर उभी राहणारी सुंदर कलाकृती आनंदाची अनुभूती देऊन जाते, हीच अनुभूती “एक तिची गोष्ट” च्या माध्यमातून नाट्यरसिकांना मिळणार आहे. या सृजनशील कलाकृतीचं खास आकर्षण म्हणजे फुलवा खामकर आणि त्यांची मुलगी आस्मा खामकर यांच्या नृत्याची अदाकारी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी, सूरज पारसनीस यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.आर्या आंबेकर, वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. संगीत निषाद गोलांब्रे यांचे आहे. चाळीशीतली अनया आणि तिच्या आयुष्यात आलेली एक किशोरवयीन मुलगी या दोघींच्या भावविश्वातून या नृत्यनाटिकेची कथा उलगडते.

येत्या काळात मराठी कला, साहित्य आणि संस्कृती सर्वदूर पोहोचवणं हे ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’चं उद्दिष्ट असल्याचं गौरी कालेलकर-चौधरी यांनी सांगितलं. भविष्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या व विषयाच्या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रम राबवणार असून ज्यात कला संस्कृतीपासून तरुणांच्या कल्पनाशक्तीला, सृजनशक्तीला वाव देण्याचा प्रयत्न असल्याचे गौरी कालेलकर-चौधरी यांनी सांगितले.
Comments
Add Comment

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने सांगितला 'तो' भयानक किस्सा...

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घराघरात पोहचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरला आपण

प्रसिद्ध युट्युबरचा देश सोडून जाण्याचा निर्णय, कारण आले समोर?

मुंबई : युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी तीनमुळे प्रसिद्धीस आलेला अरमान मलिक कायदेशीर अडचणीत सापडल्यामुळे त्याने देश

बॉलिवूडची ग्लॅम नायिका दीपिकाने अखेर आठ तासांच्या ड्युटीबद्दल सोडले मौन!

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची नायिका दीपिका पादुकोण मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. दीपिका आई

गणिताचे महत्त्व

करिअर : सुरेश वांदिले गणितीय कौशल्यामुळे विविध व्यामिश्र समस्या अधिक साकल्याने समजून घेणे सुलभ जाते. विश्वाची

थिएटर नाही; तर वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहातच लावले चित्रपटाचे शो!

‘कुर्ला टू वेंगुर्ला’चे सर्व शोज हाऊसफुल्ल माती आणि नाती जोडणारा सिनेमा असे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, तो

अभिनेते अजय पूरकर साकारणार खलनायक

नायकाप्रमाणे क्रूर खलनायकही चित्रपटांत गाजलेत! याआधी सकारात्मक भूमिकेत दिसलेले कलाकार आता नकारात्मक पात्र