
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे गेल्या आठवड्यात आयपीएल २०२५ची स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, आता १७ मेपासून पुन्हा एकदा आयपीएलचा थरार रंगणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे ब्लॅकआऊटमुळे ८ मेला धरमशाला येथे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच थांबवावा लागला होता. सर्व सामने स्थगित करण्यात आले होते. यानंतर नव्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.
त्यातच आयपीएलची पुन्हा घोषणा झाल्यानंतर परदेशी खेळाडू पुन्हा भारतात येऊन बाकी सामने खेळणार की नाही याबाबत सगळ्याती आधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रतिक्रिया दिली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रेस रिलीजमध्ये सांगितले की आयपीएलसाठी पुन्हा भारतात जावून खेळायचे की नाही हा पूर्णपणे खेळाडूंचा प्रश्न आहे. आयपीएलमध्ये अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि कमेंटेटर रूपात सामील आहेत. त्यातील अधिकांश लोकांनी भारत सोडून मायदेशात परतले आहेत. अनेक खेळाडू तसेच कोच भारत-पाकिस्तान यांच्यातील घटनेने घाबरले आहेत.
Cricket Australia released a statement this morning regarding players in the IPL: https://t.co/Pn8cNFb5dx pic.twitter.com/yAcqR4CGr4
— cricket.com.au (@cricketcomau) May 12, 2025
त्यातच जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना आहे. ११ जूनला हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक सामन्यावर सुरू आहे. म्हणजेच ३ जूनला आयपीएलचा फायनल सामना आणि त्यानंतर एका आठवड्यातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना असणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या विधानात म्हटले की क्रिकेट ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या वैयक्तिक निर्णयाला समर्थन देईल. त्यांना भारतात परतायचे आहे की नाही हे त्यांनी ठरवावे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याला पाठिंबा देईल. संघ व्यवस्थापन त्या खेळाडूंसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तयारीच्या निहितार्थवर काम करेल जे उरलेल्या आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग निवडतील. आम्ही सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षेबाबत ऑस्ट्रेलियन सरकार आणि बीसीसीआयसोबत संवाद साधत आहोत.