
मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE Board 2025 Result) च्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. बोर्डाने दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालाची लिंक देखील सक्रिय करण्यात आली आहे. यावर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येतील.
यावर्षीही मुली राहिल्या पुढे
यावर्षी सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का ९५% आणि मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का ९२.६३% होता. त्याच वेळी, ट्रान्सजेंडर्सचा निकाल ९५ टक्के लागला आहे. यावर्षी सीबीएसई दहावीच्या निकालासाठी २३,८५,०७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २३,७१,९३९ विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले आणि २२,२१,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.६६ होती. या वर्षी निकाल गेल्या वर्षीपेक्षा ०.६६ टक्के चांगला लागला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या निकालात यावर्षी मुलींचा उत्तीर्ण होण्याचा निकाल ९१.६४% आहे, तर मुलांचा ८५.७०% आणि ट्रान्सजेंडर्सचा निकाल १०० % आहे. या वर्षीचा निकाल २०२४ पेक्षा चांगला लागला आहे. मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का मुलांपेक्षा ५.९४% जास्त आहे. या वर्षी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत १६,९२,७९४ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि त्यांपैकी १४,९६,३०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी एकूण ४४ लाखांहून अधिक विद्यार्थी १२ वी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते.
सीबीएसई बोर्डाचे निकाल या वेबसाइटवर उपलब्ध असतील
विद्यार्थी त्यांचे निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbseresults.nic.in, results.cbse.nic.in द्वारे तपासू शकतील. याशिवाय, विद्यार्थ्यांना त्यांची डिजिटल मार्कशीट, पास सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट डिजीलॉकरवर देखील प्रदान केले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मिळालेल्या लॉगिन तपशीलांचा वापर करावा लागेल.