Tuesday, May 13, 2025

देशमहत्वाची बातमी

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सचा मोठा निर्णय

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात एअर इंडिया आणि इंडिगोने एक महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे. या दोघांन मंगळवारी काही शहरातील फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. इंडिगोने सांगितले की प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता चंदीगड आणि राजकोटसह अनेक शहरांच्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. एअर इंडियानेही फ्लाईट रद्द करण्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट दिले आहे.


इंडिगोने एक्सवर फ्लाईट रद्द करण्याबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, तुमची सुरक्षा आमच्यासाठी प्राथमिकता आहे. १३ मेसाठी जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटपासून फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. आमची टीम खूप गंभीरतेसह स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तुम्हाला लवकरच अपडेट देऊ.






Comments
Add Comment