Tuesday, May 13, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजLifestyle

Varmala Designs : वधूवरासाठी खास आकर्षक वरमाला!

Varmala Designs : वधूवरासाठी खास आकर्षक वरमाला!

सध्या लग्नाचा सिझन सुरु झाला आहे. या सिझनमध्ये यंदाच्या अनेक ट्रेंडिंग गोष्टी समोर येत आहेत. तसेच काही ट्रेंड्सही येत आहेत. साडीचे, नववधूच्या लेहेंग्याचे, मेकअपचे असे अनेक ट्रेंड सध्या मार्केटमध्ये सुरु आहेत. यामध्ये एक महत्वाचा घटक म्हणजे वधू-वरांसाठी हार होय. हिंदू विवाहांसाठी हार खूप महत्वाचे मानले जाते. आजकाल लग्नसोहळ्यात विविध प्रकारचे हार पाहायला मिळतात. काहींना साधे आणि सोबर हार आवडतात, तर काहींना फुलांनी सजवलेली आणि अतिशय दर्जेदार वरमाला. लग्नाच्या प्रमुख विधींपैकी हाही एक महत्त्वाचा भाग आहे. लग्नात वधू-वरांच्या पोशाखांना जेवढे महत्त्व असते, तेवढेच महत्त्व हारांनाही असते. लग्नाच्या मंडपात क्लिक केलेले वधू-वरांचे फोटो सुंदर बनवणारे काही असेल तर ते म्हणजे त्यांच्या वरमाला असतात. आज आम्ही या लेखातून तुम्हाला वधू वरांसाठी अशाच सुंदर फुलांंच्या हारांंच्या डिझाईन्स दाखवणार आहोत, ज्या सर्वांना आवडतील.




कमळ वरमाला


या प्रकारच्या वरमालेत कमळाची फुले वापरली जातात, जी विविध रंगांची असू शकतात. वधूवरांचा आऊटफिट अगदी सोबर असेल तर या वरमाला अतिशय आकर्षक दिसू शकतात.



हलक्या आणि टवटवीत फुलांच्या वरमाला


काही वेळा वरमाला फारच जड होतात आणि वधू-वरांच्या खुर्चीवर ठेवलेल्या आढळतात. हे टाळायचं असल्यास तुम्ही हलक्या वरमालांची निवड करू शकता. ज्या दिसायलाही फारच सुंदर असतात. या वरमालांमुळे तुमच्या वेंडिग लूकला एक अनोखा टच मिळण्यास मदत होईल.




मोत्यांच्या वरमाला


तुम्हाला फुल वाया घालवायची नसल्यास किंवा तुमच्या वरमाला लग्नानंतरही जपून ठेवायच्या असल्यास सर्वात चांगला ऑप्शन आहे, तुम्ही मोत्याच्या वरमाला खरेदी करु शकता. ज्यांना साध्या आणि क्लासिक लूकची आवड असेल त्यांच्यासाठीही मोत्याच्या माळांचा पर्याय एकदम परफेक्ट आहे.



शाही वरमाला


या प्रकारात खास असं काय आहे, असा विचार तुम्ही करत असाल. या वरमालांमध्ये फक्त फुलंच नाहीतर रिबन आणि इतर सजावटीचाही वापर केला जातो. ज्यामुळे या वरमालांना मिळतो शाही टच. अनेकदा महाराष्ट्रीयन शाही लग्नांमध्ये याचा वापर हमखास केलेला असतो.




पान आणि फुलांच्या रंगबेरंगी वरमाला


पानांचा आणि रंगीबेरंगी फुलांचा वापर करून तयार केलेल्या वरमाला फारच आकर्षक आणि सुंदर दिसतात. त्यामुळे तुम्हाला जास्त शाही वरमाला नको असल्यास हा पर्याय चांगला आणि ईकोफ्रेंडली आहे. डेस्टिनेशन लग्न असल्यास हा पर्याय उत्तम आहे.




लाल गुलाबाच्या वरमाला


गुलाबाची फुल प्रत्येकाला आवडतात. आपल्या चेहऱ्यासोबतच प्रत्येक आऊटफिटलाही गुलाब छान मॅच करतात. त्यामुळे सध्या गुलाबाच्या वरमाला फारच ट्रेंडमध्ये आहेत. या हारांमध्ये तुम्ही दोन प्रकारे हार निवडू शकता. इंग्लिश कलर्समधील गुलाबाचे हार किंवा टिपिकल लाल गुलाबाच्या वरमाला.




गुलाबी गुलाबांच्या वरमाला


यामध्ये काही गुलाब हे पांढऱ्या रंगाचे आणि काही गुलाब हे गुलाबी रंगाचे असतात. अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या लग्नात अशा वरमाला वापरल्या आहेत. या दिसायला खूप सुंदर आणि नाजूक दिसतात. या वरमाला हलक्या असल्याने यांना अधिक मागणी आहे.




लाल-पांढऱ्या गुलाबाच्या वरमाला


साधारण लग्नात लाल रंगाच्या गुलाबाच्या वरमाला वापरल्या जातात. पण हल्ली या रंगांमध्ये अनेक बदल दिसून येत आहेत. लालसोबत आता अनेक कलर वापरले जात आहेत. त्यामुळे लाल सोबत आता पांढरा गुलाबही वापरला जात आहे. तो दिसायला शाही वाटतो आणि त्यामुळे एक वेगळा लूक येतो. त्याल अनुसरुन तुम्ही तुमचा लग्नाचा पोषाख ठरवू शकता.

Comments
Add Comment