
नागपूर: नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवारात एका जुन्या खाणीतील खड्ड्यात भरलेल्या पाण्यात बुडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली. मृतांची नावे अद्याप कळली नसली तरी हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पुढे आली असून हा अपघात आहे की सामूहिक आत्महत्या ? याबाबत संभ्रम आहे.
नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यात सुरगाव शिवार येथील जुन्या खाणीच्या खड्ड्यात भरलेल्या पाण्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव पथकाचे मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये एक पुरुष दोन महिला आणि दोन किशोरवयीन बालकांचा समावेश आहे. अर्थातच ही अचानक घडलेली घटना आहे की सामूहिक आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुही पोलीस पुढील तपास करत आहेत.