
पुणे (प्रतिनिधी) : दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून मंगळवारी, दि. १३ मे रोजी दुपारी १ वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन पाहता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले आहे.
निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, त्यात निकालाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्व माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. ५ मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल लागला होता. तेव्हापासून दहावीच्या निकालाकडे विद्याथ्यचि डोळे लागले होते. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीचा निकाल १५ मे पर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे अगोदरच स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण रकितस्थळांवरून उपलब्ध होतील, निकालाची प्रत देखील घेता येईल.
या संकेतस्थळांवर मिळेल अतिरिक्त माहिती
www.mahresult.nic. in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard. in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार असून निकालाबाबतचा अन्य तपशील उपलब्ध होईल.
गुणांची पडताळणीही करता येणार
निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) इतर कोणत्याही विशिष्ट विषयात विद्यार्थ्याला गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन किsया स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने स्वतः किंवा शाळामार्फत अर्ज करता येईल, हा अर्ज मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ https://ssc_student.mahahsscboard.in/ यावर करता येईल. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी १४ मे ते २८ मे पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे, तर पुरवणी परीक्षेसाठी १५ मेपासून अर्ज भरता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.