Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

शिर्डी दर्शनासाठी निघालेले... पण स्वप्नातही नकोसा अपघात! दोन ठार, पाच जखमी

शिर्डी दर्शनासाठी निघालेले... पण स्वप्नातही नकोसा अपघात! दोन ठार, पाच जखमी

सोलापूर : शिर्डी दर्शनासाठी हैदराबादहून निघालेल्या भाविकांच्या कारला बारसवाडा फाट्यावर भीषण अपघात झाला. विना नंबरच्या भरधाव हायवाने समोरून धडक दिली आणि दोन भाविक दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.


ही घटना रविवार, ११ मे रोजी मध्यरात्री ११.३० वाजता धुळे–सोलापूर महामार्गावर घडली. धडक इतकी जोरात होती की जेसीबीच्या साहाय्याने मृतदेह आणि जखमींना कारमधून बाहेर काढावं लागलं.


मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जी रामू (वय ४५) जी माधुरी (वय ४०) दोघेही राहणारे हैद्राबाद यांचा जागीच मृत्यू झाला असून श्रीवाणी ४१, अनुषा १७, मेघना १२, ऋषिका ०७, नागेश्वर राव ४५ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



भाविक कुटुंब "किया कॅरेन्स" गाडीने (टीजी ०८ क्यू ०५५८) शिर्डीकडे रविवारी दुपारी १२ वाजता निघाले होते. बारसवाडा फाट्याजवळ आले असताना भरधाव वेगात आलेल्या विना नंबर हायवाने थेट समोरून धडक दिली.


अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, तर महामार्ग रुग्णवाहिका १०३३ ने जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Comments
Add Comment