
पुणे : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने देशभरातून त्याला विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी "तुर्की बॅन" ची घोषणा करत तुर्कीहून येणाऱ्या सफरचंदांवर थेट बहिष्कार टाकला आहे.
त्यामुळे पुण्यातील घाऊक आणि किरकोळ बाजारातून तुर्की सफरचंद गायब झाले आहेत. परिणामी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडहून येणाऱ्या सफरचंदांना मागणी वाढली असून, त्यांच्या दरातही वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांवर तुफान हल्ला चढवत पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. यावेळी ...
मार्केट यार्डातील सफरचंदाचे व्यापारी सत्यजित झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणी सफरचंदाच्या १० किलो पेटीच्या दरात २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातही दर किलोमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.
तुर्कीचा बहिष्कार ही देशप्रेमाची आर्थिक चळवळ बनत चालली आहे. व्यापाऱ्यांनी देशहितासाठी परदेशी आयातीत फेरबदल करत इतर देशांतील पर्याय निवडले आहेत. तणावाच्या काळात व्यापा-यांनी दाखवलेले हे ऐक्य आणि देशभक्तीचं दर्शन निश्चितच उल्लेखनीय आहे.