
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान दोन्ही देशांच्या डीजीएमओंची आज चर्चा झाली. भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि पाकिस्तानी डीजीएमओ कासीफ अब्दुल्ला यांच्यात हॉटलाईनवरून चर्चा झाली.
यावेळी पाकिस्तान काहीअंशी नरमला असल्याचे पाहायला मिळाले तर यापुढे कोणत्याही प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही, अशी मोठी ग्वाही यावेळी दोन्ही देशांच्या डीजीएमओंच्या चर्चेवेळी पाकिस्तानकडून देण्यात आली.

नवी दिल्ली : पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांवर तुफान हल्ला चढवत पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. यावेळी ...
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या डीजीएमओंच्या चर्चेंदरम्यान पाकव्याप्त काश्मीर, दहशतवादाच्या मुद्द्याशिवाय इतर कोणतीही चर्चा होणार नसल्याचे सांगण्यात आले होते.