महाराष्ट्रातील मोटार परिवहन सीमा चौकी लवकरच बंद होणार

  60

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती


मुंबई (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्या आनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे आणि व्यावसायिक वाहनांच्या हालचाली तील अडथळे दूर करणे हा आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सन १९६६ मध्ये स्थापन झालेल्या या सीमा चौक्यांचा उद्देश वाहनांची हालचाल नियंत्रित करणे, परिवहन नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि रस्ते कर वसूल करणे असा होता. मात्र GST लागू झाल्यानंतर व डिजिटल अंमलबजावणीच्या उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे प्रत्यक्ष चौकशीसाठी स्थापन केलेल्या या सीमा चौकींची आवश्यकता आता उरलेली नाही.


या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील परिवहन विभागाला निर्देश दिले होते. तसेच मुख्य परिवहन आयुक्त कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सीमा चौकी लवकरच बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्याबरोबरच राज्य ट्रान्सपोर्ट युनियन ने देखील वारंवार यासंदर्भात निवेदन देऊन सीमा चौक्या बंद करण्याबद्दल मागणी केली होती. त्या अनुषंगाने प्रशासकीय त्रुटी दूर करून सकारात्मक अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे. त्यांच्या मंजुरी नंतर राज्याच्या सीमेवरील चेकपोस्ट बंद करण्यात येतील.


तत्पूर्वी महाराष्ट्रात मोटार परिवहन व सीमाशुल्क विभाग यांच्या एकत्रित तपासणी नाक्यांसाठी "इंटिग्रेटेड चेक पोस्ट" प्रकल्प राबवण्यात आला होता. त्यासाठी में अदानी प्रा.लि. या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. तसेच संबंधित सुविधांचे संचालन व देखरेख करण्यासाठी त्यांच्या सोबत करार केले गेले होते. तथापि, हे सीमा नाके बंद करण्याच्या निर्णय झाल्यामुळे संबंधित संस्थेला नुकसान भरपाई म्हणून ५०४ कोटी रुपये अदा करणे आवश्यक आहे. तथापि, ही रक्कम अदा केल्यानंतर संबंधित तंत्रज्ञान व स्थावर मालमत्ता परिवहन विभागाच्या मालकीची होणारं आहे, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. या संदर्भात परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने या निर्णयाचे परिणाम व परिणामकारकता यांचा सखोल अभ्यास केला. या अहवालाच्या आधारे शासनाने हे निष्कर्ष काढले की, ऑनलाईन प्रणाली व इलेक्ट्रॉनिक देखरेखीद्वारे प्रत्यक्ष चौकशीची गरज प्रभावीपणे बदलता येऊ शकते. या संक्रमणामुळे कार्यक्षमतेत वाढ, विलंब कमी होणे आणि गैरप्रवृत्ती रोखण्यास मदत होईल. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक मांनी केले.

Comments
Add Comment

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी