
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लॉटरी
मुंबई : येत्या दिवाळीत म्हाडाची मुंबईमधील पाच हजार घरांसाठी लॉटरी (MHADA Lottery) येणार आहे. यापूर्वी याचवर्षी जुलै महिन्यामध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे चार हजार घरांची बंपर लॉटरी काढली जाणार आहे. यातील सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
म्हाडातर्फे दरवर्षी राज्यात सुमारे ३० हजार घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन आहे. त्यानुसार दर तीन ते चार महिन्यांनी म्हाडाच्या विविध मंडळाची लॉटरी निघणार आहे. गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळाने तीन लॉटरी काढल्या असून सुमारे १० हजार जणांचे घराचे स्वप्न साकार केले आहे.
आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा सुमारे ४ हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी कोकण मंडळाने सुरू केली आहे. यात म्हाडाने स्वतः चितळसर येथे उभारलेल्या ११७३ घरांसह हाउसिंग स्टॉकमधून म्हाडाला मिळालेल्या घरांचा देखील समावेश असणार आहे. कल्याण येथे एकाच खासगी विकासकाकडून म्हाडाला अडीच हजार घरे उपलब्ध होणार असून यांचा देखील लॉटरीमध्ये समावेश केला जाणार आहे.

पुणे : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने देशभरातून त्याला विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ...
चितळसर येथे म्हाडाने २२ मजली ७ इमारती उभारल्या असून येथील पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने ठाणे महानगर पालिकेकडून अद्याप या इमारतींना ओसी मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर म्हाडा आणि ठाणे महापालिका अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून सदर प्रकल्पासाठी अमृत योजनेंतर्गत महापालिका पाण्याची टाकी बांधणार आहे. तोपर्यंत येथील घरांना पाणी पुरवठा करण्यासाठी तात्पुरती जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यानंतर ओसी मिळताच येथील घरांचा लॉटरीमध्ये समावेश केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.