
मुंबई : हॉम्बले फिल्म्स आणि कलीम प्रॉडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत अश्विन कुमार दिग्दर्शित 'महावतार नरसिंह' या चित्रपटाचा एक नवा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये भव्य दृश्यांद्वारे एक महाकाव्यात्मक पौराणिक कहाणीचे सादरीकरण करण्यात आले.
अश्विन कुमार यांचा आगामी चित्रपट ‘महावतार नरसिंह’ सध्या पोस्टर्समुळे चर्चेत आहे. हा चित्रपट हॉम्बले फिल्म्स आणि कलीम प्रॉडक्शन्सने संयुक्तपणे केला आहे. 'महावतार' ही एक सिरीज आहे आणि हा त्यातल पहिला भाग आहे. भगवान विष्णूंच्या विविध अवतारांच्या कथा यामध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. महावतार नरसिंह हा हॉम्बले फिल्म्सचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या बॅनरने याआधी KGF Chapter 1 & 2, सालार: पार्ट 1 – सीजफायर, आणि कांतारा सारखे पॅन-इंडिया ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
नृसिंह जयंतीच्या दिवशी, 'महावतार नरसिंह'च्या निर्मात्यांनी २५ जुलै २०२५ ही तारीख निश्चित केली आहे. 'महावतार नरसिंह' हा चित्रपट २५ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट कोणत्या तारखेला प्रदर्शित करणार हे जाहीर करतेवेळी एक जबरदस्त व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओत महावतार नरसिंहाचे रौद्र रूप आणि त्याची दिव्य गर्जना दाखवण्यात आली आहे. या व्हिडिओमधून एक संदेश दिला आहे.
'महावतार नरसिंह'चे दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते शिल्पा धवन, कुशल देसाई आणि चैतन्य देसाई आहेत . कलीम प्रोडक्शन्सच्या अंतर्गत त्यांनी हॉम्बले फिल्म्ससोबत मिळून हा चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट 3D फॉरमॅटमध्ये आणि पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
View this post on Instagram