
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरुन निकालाची प्रिंट काढता येईल तसेच निकालाची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करुन घेता येईल. निकाल ऑनलाईन उपलब्ध असला तरी पुढील शैक्षणिक वर्षासाठी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी निकालाची अधिकृत प्रत दाखवावी लागते. यासाठी निकालाची मूळ प्रत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत मिळणार आहे.
ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या वेबसाईटवर स्वतः अथवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याकरिता विद्यार्थ्यांना १४ मे पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज भरताना Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking द्वारे शुल्क भरण्याची सोय आहे.
माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या (answer sheet) पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत (photocopy) मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.
निकाल पाहण्यासाठी लिंक :
1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. http://hscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org