
मुंबई : भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तब्बल १४ वर्षांनंतर विराटने हा मोठा निर्णय घेतला असून, त्याची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. यानंतर विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.
विमानतळावरील त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. काही जणांनी विचारलंय – "विराट आता देश सोडून जातोय का?", तर काही जण भावूकही झाले आहेत.
कसोटीमधून निवृत्ती आणि अनुष्काचं सिनेमापासून अंतर, या दोन्ही गोष्टी पाहता, काही नेटकऱ्यांनी अंदाज वर्तवला की हे दोघं कायमचं परदेशात स्थायिक होणार का?

१४ वर्षांच्या दमदार प्रवासाला भावनिक पूर्णविराम मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'रन मशीन' आणि माजी कसोटी कर्णधार विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटला ...
एका युजरने लिहिलंय की, “वहिनी थांबा… दादालाही थांबवा!” तर दुसऱ्याने विचारलं – “गाडीत बसून निवृत्ती घेतली आणि आता थेट देश सोडून चाललात का?”
अलीकडच्या काळात हे दोघं बराचसा वेळ परदेशातच राहताना दिसले. वामिका आणि अकाय या दोन मुलांसोबत त्यांचं लंडनमध्ये स्थायिक होणं चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वी विराट सोशल मीडियावरही चर्चेत आला होता, जेव्हा त्याच्या अकाऊंटवरून अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅनपेजला लाईक मिळालं होतं. नंतर त्याने इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे झालं, असं स्पष्टीकरण दिलं.
या सगळ्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमधून एक युग संपलं, पण त्याचा वैयक्तिक आयुष्य अजूनही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
View this post on Instagram