कोलंबो येथील तिरंगी मालिकेवर भारतीय महिला संघाचा कब्जा

यजमान श्रीलंकन महिला संघाचा ९७ धावांनी पराभव


कोलंबो : कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. भारतीय फलंदाज स्मृती मानधनाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ३४२ धावा केल्या. श्रीलंकन महिला संघाला अवघ्या २४५ धावाच करता आल्या. अखेर भारताने ९७ धावांनी हा सामना जिंकत विजेतेपदावर कब्जा करत आपले नाव कोरले. भारताच्या ३४३ धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या श्रीलंकन महिला संघाला पहिल्याच षटकात मोठा झटका बसला. हंसिनी पेरेराला अमनज्योत कौरने त्रिफळाचित करत तंबूत धाडले. त्यानंतर विष्मी गुणरत्ने आणि चमारी अटापट्टू जोडीने ६८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. मात्र ही भागीदारी कौरने तोडली. तिने गुणरत्नेला त्रिफळाचित करत ३६ धावांवर माघारी धाडले. चमारीने डीसील्व्हा सोबत संघाचा धावफलक हलता ठेवत ५३ धावांची भागीदारी केली.


अखेर स्नेह राणाने दोन्ही फलंदाजांना माघारी धाडले. चमारी अटापट्टूने ५१, तर डीसील्व्हाने ४८ धावा केल्या. त्यानंतर विहंगा, बडांगे हे श्रीलंकन संघांचे खेळाडू स्वस्त्यात माघारी परतले. अनुष्का संजीवनीने सुगंदिका कुमारीसोबत ५१ धावांची भागीदारी करत श्रीलंकन संघाला विजयाच्या आशा दाखवल्या. मात्र श्रीलंकन संघाच्या या आशेवर भारतीय महिला गोलंदाजांनी पाणी फेरले. संपूर्ण श्रीलंकन संघ ५० षटकेही पूर्ण खेळू शकला नाही. २४५ धावांत त्यांचे सर्व खेळाडू बाद झाले. भारतीय महिला संघाने ९७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिला संघाकडून स्नेह राणाने ४ तर अमनज्योत कौरने ३ गडी बाद केले. तत्पूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीर मानधना आणि प्रतीक रावल यांनी सावध सुरुवात केली आणि पहिल्या ५ षटकांत फक्त १४ धावा केल्या. तथापि, नंतर त्याने धावांचा वेग वाढवला. रावल बाद होण्यापूर्वी दोघांनी ७० धावा जोडल्या. त्यानंतर मंधानाला हरलीन देओलच्या रूपात आणखी एक मजबूत जोडीदार मिळाला, दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी १०० पेक्षा जास्त धावा जोडल्या. दरम्यान, ५० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर मानधना आक्रमक दिसली.


भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या बॅटने सामन्यात महत्वाच्या धावा आल्या. हरमनप्रीत कौर हिने संघासाठी ३० चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या यामध्ये तिने यामध्ये तिने १ षटकार आणि ४ चौकार मारले. रिचा घोष मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरली तिने आजच्या सामन्यात ९ चेंडू खेळले आणि ८ धावा करून बाद झाली. स्मृती मानधना हिने संघासाठी १०१ चेंडूंमध्ये ११६ धावा केल्या. यामध्ये तिने २ षटकार आणि १५ चौकार मारले. ५० षटकात भारतीय महिला संघाने ७ गडी गमावून ३४२ धावा केल्या होत्या. श्रीलंकेने महिला संघासमोर ३४३ धावांचे लक्ष होते.

Comments
Add Comment

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून