
मुंबई: सीबीएसईचे १० वी आणि १२वीची परीक्षा देणारे ४२ लाखाहून अधिक विद्यार्थी सध्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मिडिया रिपोर्ट्सनुसार सीबीएसई १०वी आणि १२वीचे निकाल या आठवड्यात जाहीर होऊ शकतात. गेल्या वर्षी मंडळाने १३ मेला निकाल जाहीर केले होते. या वर्षीही १३ मेला निकाल जाहीर करतील अशी आशा आहे.
दरम्यान, सीबीएसईकडून अधिकृतरित्या याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in वर जाऊन सीबीएसई १०वी आणि १२वीचा निकाल चेक करू शकतात.
लिंक सुरू झाल्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवरून निकाल चेक करू शकता.
cbse.gov.in
cbseresults.nic.in
results.cbse.gov.in
लवकरच जाहीर होणार निकाल
विविध रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षणख मंडळ लवकरच अधिकृत वेबसाईटवर १०वी आणि १२वीचा निकाल जाहीर करणार आहे. या वर्षी परीक्षेसाठी ४२ लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. यात २४.१२ लाख विद्यार्थी १०वीच्या परीक्षेस बसले होते तर १७.८८ लाख विद्यार्थी १२वीच्या परीक्षेस बसले होते.