आयपीएल खेळायला भारतात न परतणाऱ्या खेळांडूवर होणार बीसीसीआयकडून कारवाई

मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता या दोन्ही देशात युद्धविराम झाल्यानंतर पुन्हा आयपीएल सामने सुरू होण्याचा विचार सुरू झाला आहे.BCCI ने आयपीएलला स्थगिती दिल्याने बरेच परदेशी खेळाडू आपापल्या देशात परतले आहेत. त्यामुळे या सामन्यासाठी अनेक परदेशी खेळाडूंच्या परतण्यावर आता प्रश्नचिन्ह आहे.त्यात बहुतांश ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. या सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू जर परतले नाहीत तर बीसीसीआयकडून त्यांच्याविरोधात कठोर निर्णय घेतला जाईलं.


आयपीएल २०२५ पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा असताना ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा परतण्यावर आता प्रश्नचिन्ह आहे. मिडिया रिपोर्टनुसार, स्टार्कच्या मॅनेजरने याचे संकेत दिले आहेत की तो कदाचित भारतात परतणार नाही. याचप्रकारे खांद्याच्या दुखापतीमुळे जोश हेजलवुड याच्याही परतण्याची शक्यता कमी आहे. पॅट कमिंस, ट्रेविस हेड यांचीही हीच परिस्थिती आहे. आयपीएलमध्ये न परतण्यामागे WTC फायनलचेही कारण दिसून येते. ११ जूनपासून हे सामने सुरू होत आहेत त्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम ६ जूनला इंग्लंडला पोहचेल. ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनला त्यांचे महत्त्वाचे खेळाडू आयपीएल सामन्यांमुळे अनफिट आणि दुखापतग्रस्त व्हावेत असं वाटत नाही.


दरम्यान, IPL 2025 पुन्हा एकदा १६ मे पासून सुरू करण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. भारत सरकारनेही त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्याशिवाय आयपीएल सीरिज ३० मे पर्यंत वाढवण्याची चर्चा आहे. आयपीएलमध्ये अजून १७ सामने खेळणे बाकी आहे. ज्यात १३ ग्रुप स्टेज मॅच आहेत. या सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू आले तर ठीक आहे परंतु जर ते परतले नाहीत तर बीसीसीआय त्यांच्याविरोधात कठोर निर्णय घेत त्यांच्यावर २ वर्ष बंदी आणू शकते.


आयपीएल २०२५ पासून बीसीसीआयनं अशा खेळाडूंसाठी नवीन नियम बनवले आहेत जे मध्ये सामने सोडून त्यांच्या देशात परतात किंवा कुठल्या तरी बहाण्याने सामने स्कीप करतात. यावेळी या परदेशी खेळाडूंवर बीसीसीआयने कठोर पावले उचलली आहेत. या खेळाडूंना बीसीसीआयने आयपीएलमध्ये २ वर्षाची बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. BCCI ने या नियमाचा वापर इंग्लंडच्या हॅरी ब्रूकवर केला आहे. आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंवरही अशीच कारवाई होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या