
मुंबई : अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स वधारले आहे. मुंबईच्या शेअर बाजारात अर्थात बीएसईमध्ये सोमवारी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली. हे शेअर ४३.५० रुपयांवर पोहोचले. कंपनी तोट्यातून नफ्यात परतली आहे. रिलायन्स पॉवरने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत १२६ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला ३९७.५६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
रिलायन्स पॉवरचे एकूण उत्पन्न चौथ्या तिमाहीत २०६६ कोटी रुपये होते. गेल्या वर्षी याच कालावधीत रिलायन्स पॉवरचे एकूण उत्पन्न २१९३.८५ कोटी रुपये होते. कंपनीचा एकूण खर्च मार्च २०२५ च्या तिमाहीत १९९८.४९ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २६१५.१५ कोटी रुपयांवर होता.
आर्थिक वर्ष २०२४-२५ चा विचार केला तर रिलायन्स पॉवरचा एकत्रित निव्वळ नफा २९४७.८३ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीला २०६८.३८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
गेल्या एका वर्षात रिलायन्स पॉवरचे शेअर्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत १३ मे २०२४ रोजी २४.४० रुपये होती. १२ मे २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ४३.५० रुपयांवर पोहोचले. गेल्या पाच वर्षांबद्दल बोलायचे झाले तर रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. १५ मे २०२० रोजी कंपनीचे शेअर्स १.८० रुपयांवर होते. १२ मे २०२५ रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स ४३ रुपयांच्या पुढे गेले. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये २६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ५३.६४ रुपये आहे. त्याच वेळी, रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २३.३० रुपये आहे.