
अमरावती, शिरखेड : गावातील शेतकऱ्याच्या वहिवाटीच्या रस्त्यावर आणि सरकारी जमिनीवर दिलीप खराते यांनी सिमेंट काँक्रीटचं पक्कं घर बांधलं होतं. याच परिसरात इतर नागरिकांनीही गुरांचे गोठे उभारले होते. ही सर्व अतिक्रमणं सर्वे नं. ७३ वर करण्यात आली होती.
वर्ष २०१७–१८ पासून सुरू असलेलं हे अतिक्रमण, ग्रामपंचायतीने वारंवार नोटीस देऊनही थांबवलं गेलं नव्हतं. अखेर ३० जुलै २०२४ रोजी अंतिम नोटीस देण्यात आली. खराते यांनी अप्पर आयुक्तांकडे दाद मागत स्टे मिळवला, पण ५ मे २०२५ च्या सुनावणीत तो स्टे उठवण्यात आला.

१४ वर्षांच्या दमदार प्रवासाला भावनिक पूर्णविराम मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'रन मशीन' आणि माजी कसोटी कर्णधार विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटला ...
शेवटी १० मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गजराजच्या सहाय्याने आणि पोलीस बंदोबस्तात शिरखेड ग्रामपंचायतीने अतिक्रमणावर बुलडोझर चालवला. यावेळी फक्त एकच नव्हे, तर पाच अतिक्रमणं हटवण्यात आली.