
मुंबई: काहीच दिवसांपूर्वी भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यापाठोपाठ आता सर्वाच्या गळ्यातील ताईत असलेल्या विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय असं जाहीर केलंय आणि बीसीसीआयला कळवलंय. विराट कोहलीने आताचा हा निर्णय का घेतला ? पाहूयात
विराट कोहली. क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा क्रिकेटपटू. त्याचे असंख्य चाहते आहेत. त्याच्या स्टाईल्स फॉलो करणारे फॅन्सही आहेत. मात्र याच विराट कोहलीने रोहित शर्मापाठोपाठ कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतलाय. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय असं विराटने बीसीसीआयला कळवलंय. मात्र या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती बीसीसीआयने विराट कोहलीला केलीय. विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा अद्याप केलेली नाही, मात्र त्याच्या या निर्णयाने क्रिकेटचाहत्यांमध्ये नाराजी पसरलीय.
कसोटी सामने खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. फलंदाजीत फरफॉर्म दाखवू न शकलेल्या रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतली. हाच निकष विरोट कोहलीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
आपल्या फलंदाजीने समोरच्या गोलंदाजांची पिसे काढणाऱ्या आणि पराभवाचं विजयात रुपांतर करणाऱ्या विराट कोहलीने निवृत्ती घोषणा का केली ते पाहूयात
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची कारणं
- बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सुमार फलंदाजी
-बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत निराशाजनक कामगिरी
-केवळ पर्थ कसोटीत केलं शतक
-ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा 1-3 असा पराभव
धडाकेबाज फलंदाज म्हणून ख्याती असलेल्या विराट कोहलीने जून 2011 रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. विराट कोहली पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला.
कसोटी क्रिकेटमधील कामगिरी
-एकूण 123 कसोटी सामने खेळला
-210 डावांमध्ये 46.85च्या सरासरीने धावा
-30 शतकं आणि 31 अर्ध शतकांचा समावेश
विराट कोहलीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीमुळे सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. आता बीसीसीआयने दिलेल्या फेरविचाराच्या प्रस्तावाबाबत विराट कोहली काय निर्णय घेणार याकडे क्रिकेटजगताचं आणि क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय.