
मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ओपन वेब गर्डर टाकण्यासाठी रविवार, मंगळवारी, बुधवारी आणि शुक्रवारच्या मध्यरात्री कळंबोली येथे विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडसाठी कळंबोली रेल्वे फ्लाय-ओव्हरवर ओपन वेब गर्डरच्या टाकण्यासाठी मध्य रेल्वे पनवेल आणि कळंबोली विभागादरम्यान चार विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे. हा गर्डर टाकल्यानंतर क्रियाकलापांसाठी (बुधवार व गुरुवार मध्यरात्री) आणि शुक्रवार व शनिवारच्या मध्यरात्री हा विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात यईल .
पहिला ब्लॉक रविवारी मध्यरात्री १.२० वाजता ते ४.५० वाजेपर्यत (३.३० तास) घेण्यात येईल. या दरम्यान मंगळूरु जंक्शन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोमटने येथे ०२.५८ तास ते ०४.३० तासांपर्यंत थांबवण्यात येईल. मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकणकन्या एक्सप्रेस ०४.०२ तास ते ०४.५० तासांपर्यंत पनवेल येथे थांबवण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव मांडवी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५० मिनिटांनी सुटेल. दौंड-ग्वाल्हेर अतिजलद एक्सप्रेस कर्जत-कल्याण - भिवंडी रोड मार्गे वळवली जाईल आणि पनवेल येथे थांबा दिला जाईल (पनवेलच्या प्रवाशांना कल्याण येथे ट्रेनमध्ये चढता येईल ).
दुसरा ब्लॉक मंगळवारी मध्यरात्री घेण्यात येईल. हा ब्लॉक ०१.२० वाजता ते ०४.२० वाजेपर्यंत ३ तासांचा असेल. या दरम्यान मंगलूरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस सोमटने येथे ०२.५८ तास ते ०४.१० तासांपर्यंत थांबवण्यात येईल. मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस ०४.०२ तास ते ०४.२० तासांपर्यंत पनवेल येथे थांबवण्यात येईल. तिसरा ब्लॉक बुधवारी मध्यरात्री घेण्यात येईल. हा ब्लॉक २ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत घेण्यात येईल. या ब्लॉक दरम्यान एरणाकुलम जंक्शन- हजरत निजामुद्दीन अतिजलद एक्स्प्रेस पनवेल येथे ०२.५० वाजता ते ०४.०० वाजेपर्यंत थांबवण्यात येईल . व मंगळूरु जंक्शन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ०२.५८ तास ते ०३.५० तासांपर्यंत आपटा येथे थाम्बवण्यात येईल. चौथा ब्लॉक शुक्रवारी मध्यरात्री घेण्यात येईल . हा ब्लॉक २ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत घेण्यात येईल . या ब्लॉक कालावधीत मंगळूरु जंक्शन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस सकाळी ३.११ ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आपटा येथे थांबविण्यात येईल.