Saturday, May 10, 2025

किलबिल

ओळख!

ओळख!

कथा : रमेश तांबे


एक होती मांजर काळ्या करड्या रंगाची मजबूत अंगकाठी अन्  घाऱ्याघाऱ्या डोळ्यांची गावभर फिरायची म्याव म्याव करायची मांजर सगळ्यांची आवडती होती तिला कोणाची नव्हती भीती कोणाच्याही घरात शिरे दूध पी कधी खा खीर कधी बाजारात जाऊन यायची मासे खाऊन शाळेतल्या पोरांकडून अंग घ्यायची खाजवून तर कुणा काकूच्या मांडीवर राहायची तासभर बसून सगळं कसं मजेत सुरू होतं तरी पण तिला त्यात सुख नव्हतं


तिला वाटायचं त्या कुत्र्याचं किती बरं त्याचा भू-भू आवाज किती दमदार आवाजात त्यांच्या किती दम सारी मुलं घाबरतात जाम माझा आवाज कुत्र्यासारखा असता तर मलाही सारे घाबरले असते रुबाबात फिरली असते सगळीकडे माझाही दरारा राहिला असता चोहीकडे अन् काय आश्चर्य झालं मांजरीच्या घशात काहीतरी घुसलं मांजरीला आला खोकला आवाज तिचा बदलला म्याव म्याव आवाज येईना काय झाले तिला कळेना मग ती जोर लावून ओरडली भू-भू असं म्हणाली मांजरीला आला आवाज कुत्र्याचा गायब झाला आवाज मांजरीचा मग काय मांजर खूश झाली


बारक्या पोरांना घाबरवू लागली ती लागली भू-भू करू सगळेच लागले पळू मांजरीला खूप आनंद झाला माझा आवाज बदलला मग ती खुशीतच घराच शिरली काकूच्या मांडीवर जाऊन बसली बसली तर बसली भू-भू ओरडली तशी काकूने तिला लांब फेकली हात पाय मोडले नाहीत कशीबशी वाचली स्वयंपाक घरात तिला कोणी घेईना दूध खीर खायला मिळेना अंग खाजवायला कोणी येईना जवळ तिला कोणी घेईना मांजरीला कळेना कुत्रासुद्धा भू-भू करतो पण त्याला कोणी मारत नाही मलाच असे का वागवतात प्रत्येक वेळी मला दूर सारतात


मग तिला आठवले आपण आहोत मांजर आपला आवाज आपलं दिसणं लोकांनी स्वीकारलंय आपण जसे आहोत तसेच लोकांना आवडतोय दुसऱ्यासारखं वागणं बरं नव्हं आपण आपल्या जागी दुसरा दुसऱ्याच्या जागी हत्तीला वाघाचा आवाज चालणार नाही आणि सशाला सिंहाची आयाळ शोभणार नाही प्रत्येकाची वैशिष्ट्य आहेत प्रत्येकजण वेगळा आहे अन् तरीही तो चांगला आहे उगाच दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू नये जे मिळाले त्यात समाधान मानावं.


या प्रसंगातून मांजरीला एक धडा मिळाला ज्यातून तिला आनंदाचा नवा मार्ग सापडला!

Comments
Add Comment