"शस्त्रसंधी उल्लंघनास पाकिस्तानच जबाबदार" भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतला पाकचा समाचार

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्धच्या लष्करी कारवाया थांबवण्यास औपचारिकपणे सहमती दर्शविल्यानंतर काही तासांतच, श्रीनगर आणि इतर सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी ड्रोन भारतीय हवाई क्षेत्रात घुसल्याने मोठे स्फोट ऐकू आले. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आले.


भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानला शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत योग्य पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. "सशस्त्र दल परिस्थितीवर कडक नजर ठेवून आहेत आणि आंतरराष्ट्रीय सीमा तसेच  नियंत्रण रेषेवर सीमा उल्लंघनाच्या घटनेला प्रत्युत्तर देण्याच्या कडक सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत," असे मिस्री म्हणाले.






 

शस्त्रसंधी करारापूर्वी, भारताने स्पष्टपणे सांगितले होते की आमच्या भूमीवर होणारे कोणतेही "दहशतवादी कृत्य" हे "युद्धाचे कृत्य" मानले जाईल आणि त्यानुसार त्याला प्रत्युत्तर दिले जाईल.




काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे ट्विट


जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्फोटांचे आवाज ऐकू आल्यानंतर श्रीनगरमधील हवाई संरक्षण युनिट्स पुन्हा सक्रिय झाल्याची सूचना दिली. "ही शस्त्रसंधी नाहीच. श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या हवाई संरक्षण युनिट्स आताच सक्रिय झाल्या आहेत," असे ते म्हणाले.


https://prahaar.in/2025/05/10/jammu-kashmir-chief-minister-omar-abdullah-gets-angry-says-ceasefire-violated/

नागरोटा येथील लष्कराच्या तुकडीत गोळीबार


जम्मूजवळील नागरोटा येथील लष्कराच्या तुकडीत संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर गोळीबाराची घटना घडली. ज्यात एक जवान किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुरुवातीला गोळीबार झाला, परंतु त्यानंतर कोणताही संपर्क झालेला नाही. सुरक्षा दलांनी धोक्याचे स्वरूप आणि स्रोत निश्चित करण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.

Comments
Add Comment

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

छत्तीसगढ : कुख्यात माओवादी कमांडर मडवी हिडमा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी

'दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू'

नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू आणि कठोर शिक्षा करू, असे केंद्रीय

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी

एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री?

भाजप आणि लोक जनशक्ती पक्षालाही मिळणार नेतृत्वाची संधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमध्ये सरकार