Monday, May 12, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Amitabh Bachchan Post: अमिताभ बच्चन यांचा अनोख्या पद्धतीने भारतीय सैन्याला सलाम, भावस्पर्शी पोस्ट व्हायरल

Amitabh Bachchan Post: अमिताभ बच्चन यांचा अनोख्या पद्धतीने भारतीय सैन्याला सलाम, भावस्पर्शी पोस्ट व्हायरल

Amitabh Bachchan Post: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ, आणि या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करांच्या 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) च्या यशाबद्दल X (पूर्वीचे ट्विटर) आकाऊंटवर भावस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी भारतीय सैनिकांच्या समर्थ्यांचे कौतुक केलं आहे.


दिनांक २२ मे रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये २५ पर्यटक आणि एका स्थानिक युवकाची दहशतवाद्यांनी निर्घुण हत्या केली. ज्याचा बदला घेण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानने पाळलेले ९ दहशतवाद्यांचे तळ उद्वस्त केले. इतकेच नाही, तर त्यानंतर पाकिस्तानविरोधी लष्करी कारवाईतही  भारतीय सैन्याने पाकला चांगलाच धडा शिकवला. ज्याचे देशभर कौतुक होत आहे. अमिताभ बच्चन यांनी या सर्व घटनेची सुंदर शब्दांत मांडणी करत, भारतीय सैन्यांना अनोख्या पद्धतीने सलाम केला आहे.


एक्सवरील पोस्टमध्ये या दिग्गज अभिनेत्याने पहलगांममधील भयानक दृश्याचे वर्णन करताना लिहिले की, "सुट्ट्यांचा आनंद घेत असलेल्या निष्पाप जोडप्याला त्या राक्षसाने ओढले, पतीला नग्न केले, त्याच्या धर्माची शहानिशा केल्यानंतर, त्याला गोळी मारू लागला." पुढे त्यांनी म्हंटले की,  "पत्नीने गुडघे टेकून रडून पतीला मारू नका अशी विनंती केल्यानंतरही, त्या भेकड्या राक्षसाने अतिशन निर्दयीपणे गोळ्या झाडल्या,  बसली, जोरजोरात रडून असे न करण्याची विनवणी करून देखील, ज्यामुळे पत्नी विधवा झाली."


https://x.com/SrBachchan/status/1921350983193416121

या पोस्टमध्ये बच्चन यांनी त्यांचे दिवंगत वडील, प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेतील एका ओळीचा संदर्भ देऊन भावनिक आघातचे प्रतिबिंब केले.


"है चिता की राख कर में, मांगती सिंदूर दुनिया..." ते पुढे म्हणतात, "दे दिया सिंदूर, ऑपरेशन सिंदूर!!!"


बच्चन यांनी आपल्या संदेशाचा शेवट, देशाच्या रक्षकांचे भावपूर्ण अभिवादन करण्यासाठी हरिवंश राय बच्चन यांच्या अजरामर कवितेच्या ओळीने केला. "तू ना थमें गा कभी; तू न मुड़ेगा कभी; तू न झुकेगा कभी, कर शपथ , कर शपथ, कर शपथ ! अग्नि पथ! अग्नि पथ ! अग्नि पथ !!!"


Comments
Add Comment