Saturday, May 17, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Malad Railway Station : मालाड रेल्वे स्थानकात आलेल्या लोकलमध्ये झाले ३ स्फोट

Malad Railway Station : मालाड रेल्वे स्थानकात आलेल्या लोकलमध्ये झाले ३ स्फोट

प्रवाशांमध्ये घाबरगुंडी, शॉर्टसर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज


मुंबई : चर्चगेटहून बोरीवलीला जाणारी लोकल ११.४६ वाजता मालाड स्थानकात आल्यावर सुरूवातीला ओव्हरहेड वायर तुटल्याचे सांगण्यात आले. पण फर्स्ट क्लासच्या बाजूच्या जनरल डब्यात एकापाठोपाठ एक असे एकाच डब्यात ३ स्फोट झाले. सुदैवाने गाडी प्लॅटफॉर्मवर थांबलेली असल्याने स्फोट होण्याआधीच लोकांनी धडाधड उड्या मारल्याने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.


अपघाताचे नक्की कारण समजू शकलेले नाही. परंतु पुढील सर्व गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून जातील अशी घोषणा करण्यात आली.

Comments
Add Comment