
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणात भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील युद्धसदृश परिस्थिती निवळेल. शनिवारी (१० मे) संध्याकाळी ५ वाजल्यापासून ही शस्त्रसंधी स्विकारली गेल्याचे भारतातर्फे सांगण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर ही शस्त्रसंधी करण्यात आली.
भारत सरकारने याची अधिकृत घोषणा केली असून, या निर्णयामुळे नियंत्रण रेषेवरचा तणाव काहीसा निवळणार आहे. शनिवारी दुपारी ३.३५ वाजता पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी भारतीय DGMO ना फोन करून युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजल्यापासून जमीन, आकाश व समुद्रातील सर्व प्रकारच्या लष्करी कारवाया थांबवण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश तत्काळ दिले गेले असून १२ मे रोजी पुन्हा लष्करी पातळीवरील चर्चा होणार आहे.

वॉशिंग्टन डी. सी. : भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी करुन चर्चेची तयारी दाखवली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ...
शस्त्रसंधीच्या या निर्णयानंतर लगेचच पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुले केले असून, यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये अडथळा येणार नाही.
मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये सिंधू पाणी करारावर काय होणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. भारताने शस्त्रसंधी स्वीकारली असली तरी सिंधू पाणी कराराबाबत कोणताही नवीन निर्णय घेण्यात आलेला नाही.
परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, युद्धबंदीच्या आधी किंवा नंतर कोणत्याही अटी घालण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सिंधू पाण्याचा मुद्दा सध्या खुला आहे. भारताने पाणी रोखण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, पण भविष्यातील धोरणासाठी दारं उघडी ठेवली आहेत, असा स्पष्ट संकेत यामधून मिळतो.

भारताचा पाकला थेट इशारा नवी दिल्ली : दहशतवादाच्या संदर्भात भारताने मोठा निर्णय घेतला आहे. भविष्यातील कोणतेही दहशतवादी कृत्य युद्ध समजले जाईल. ...
दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारताने दहशतवादाविरोधात कायम ठाम भूमिका घेतली आहे आणि ती भविष्यातही तशीच राहील.
तसेच पाकिस्तानकडून भारतीय लष्कराने मशिदींवर हल्ले केल्याचे आणि विविध हवाई तळांवर हानी पोहोचवली गेल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, हे सर्व दावे खोटे असून कोणतीही हानी झालेली नाही, असे स्पष्ट करत भारतीय लष्कराच्या प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानच्या प्रोपगंडाला चोख उत्तर दिले आहे.
शस्त्रसंधी झाल्यामुळे सीमाभागात काहीसा शांततेचा श्वास घेतला जात आहे. आज खन्ना, राजपुरा, समराला, फतेहगड साहिब येथे वीजपुरवठा खंडित होणार नाही. बाजारपेठा नेहमीप्रमाणे खुल्या राहतील. तत्पूर्वी, कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘पाकिस्तानने आपल्या जेएफ १७ ने आमच्या एस४०० आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र तळांना नुकसान पोहोचवल्याचा दावा केला आहे, जो पूर्णपणे चुकीचा आहे. दुसरे म्हणजे, त्यांनी सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नालिया आणि भूज येथील आमच्या हवाई तळांचे नुकसान झाल्याची चुकीची माहिती देणारी मोहीम देखील चालवली, हा दावा देखील पूर्णपणे खोटा आहे. तिसरे म्हणजे, चंदीगड आणि व्यास येथील आमच्या दारूगोळा डेपोचे नुकसान झाल्याची पाकिस्तानची चुकीची माहिती देखील पूर्णपणे खोटी आहे. भारतीय सैन्याने मशिदींचे नुकसान केल्याचा खोटा आरोप पाकिस्तानने केला.
दरम्यान, सिंधू पाणी कराराचा मुद्दा अजूनही धगधगत आहे. भारत पुढे काय निर्णय घेणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
शस्त्रसंधी म्हणजे नेमकं काय?
सलग तीन दिवसांच्या या युद्धानंतर अखेर घाबरलेल्या पाकिस्तानने शस्त्रसंधीची विनंती केली. शस्त्र संधी म्हणजे युद्धजन्य परिस्थितीत काही काळ युद्ध थांबविण्यासाठी झालेला करार होय. या करारानुसार युद्ध, लढाई किंवा हिंसक कारवाया थांबवण्यासाठी सहमती दर्शवली जाते.