
मुंबई : गेल्या काही दिवसात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'गुलकंद', 'आता थांबायचं नाय' या दोन सिनेमांचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं होतं. या १५ दिवसांत प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पण आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात सध्या सुरू असलेल्या युद्धसदृश्य स्थितीचा परिणाम बॉक्स ऑफिसवरही झाला आहे. गेल्या दोन दिवसांत सिनेमाच्या कमाईत घट झाली आहे. प्रेक्षकांनी समाजभान राखत सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता पोलिसांवरचा ताण कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येतं.
'गुलकंद' सिनेमानं पार केला ३ कोटींचा टप्पा
'गुलकंद' या सिनेमानं ९ दिवसात ३ कोटींचा टप्पा पार केला आहे. पहिल्या दिवशी सिनेमानं ५५ लाखांची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाची कमाई घटली. दुसऱ्या दिवशी सिनेमानं २५ लाखांची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी ४२ लाख, चौथ्या दिवशी ५७ लाख, पाचव्या दिवशी २३ लाख, सहाव्या दिवशी २२ लाख, सातव्या दिवशी १४ लाख, आठव्या दिवशी दोन लाख, नवव्या दिवशी १८ लाखांची कमाई झाली आहे. सिनेमाची एकूण वर्ल्डवाइल्ड कमाई ही ३.११ कोटी इतकी आहे.

Very Parivarik Trailer launched: बहुप्रतिक्षित कौटुंबिक कॉमेडी शो ‘वेरी पारिवारिक’च्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. द वायरल फीवर (TVF) च्या अधिकृत ...
गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या तुलनेत ‘गुलकंद’ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केली आहे. यामुळे, ‘गुलकंद’चं ४ दिवसांचं वर्ल्डवाइड कलेक्शन आता २.०१ कोटी इतकं झालं आहे. असं वृत्त इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलं आहे. सध्याच्या घडीला ‘गुलकंद’ सिनेमाचे बरेच शो हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे आता येत्या काळात या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.