Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजविडिओ

Ind Vs Pakistan : पाकिस्तानच्या कुरापती, घोडदौड भारताची!

Ind Vs Pakistan : पाकिस्तानच्या कुरापती, घोडदौड भारताची!

सर्व बाजूंनी पाकिस्तानचं कंबरडं मोडत आहे. तरी कुरापती काही थांबलेल्या नाहीत.पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी ड्रोन हल्ले केले. मात्र जाबाज भारतीय सेनेने पाकिस्तानचे मनसुबे पुन्हा एकदा धुळीस मिळवले. पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी होतेय. भारताने नेमकं काय केले पाहूयात



भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान बिथरलाय. चीन आणि तुर्कीये या देशांच्या पाठिंब्यावर भारतावर हल्ले करतोय. पाकिस्तानने पुन्हा ड्रोन हल्ले केले. मात्र भारताने चोख प्रत्युतर देत पाकिस्तानचं फथे १ क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केलंय. पाकिस्तानने जम्मू - काश्मीरमधील अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न भारताने हाणून पाडला. तर भारताने विमानांद्वारे हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्रं डागली, नूर खान तळ, मुरीद तळ आणि शोरकोट तळांना लक्ष्य केल्याचा दावा पाकिस्तानने केला. एकीकडे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी होतेय तरी पाकिस्तानच्या कुरापती काही थांबत नाहीत. पाकिस्तानने जम्मू - काश्मीरपासून गुजरातपर्यंत २६ ठिकाणी ड्रोन हल्ले केले. फोरोजपूरमध्ये डागलेला ड्रोन निष्क्रिय करण्यात आला. मात्र त्यानंतर आग लागली आणि त्यात तीन जण जखमी झाले.


?si=O-WpB8hLCTXovHJi

आता पाहूयात पाकिस्तानने कुठे कुठे ड्रोन हल्ले केले ?


श्रीनगर,अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगड जट्टा, जैसलमेर, बारमेर, कुआर बेट, लाखी नाला



पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागांना टार्गेट केलं. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. इतकंच नव्हे तर पाकिस्तानने नागरी विमानांचा ढालीसारखा वापर केला. लाहोरच्या आकाशात नागरी विमानं उडत होती. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक खुली ठेवली. मात्र भारताने संयम राखला. तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याकडून सीमाभागात गोळीबार केला जातोय. राजौरीमध्ये केलेल्या गोळीबारात जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद झाले आहेत.तर दोन नागरिकांचा मृत्यू झालाय.एकूणच पाकिस्तानचे कुटिल डावपेच भारत उघडे पाडत आहे. पर्दाफाश करत आहे. तसंच पाकिस्तानला अद्दल घडवा, एकादाचा धडा शिकवा अशा भावना तमाम भारतीय व्यक्त करत आहेत.


Comments
Add Comment