
Operation Sindoor Movie: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' वर आधारित चित्रपटाची घोषणा अलीकडेच सोशल मिडियावर करण्यात आली होती. ही घोषणा चित्रपटाच्या टीम्कसडून उत्स्फूर्तपाने करण्यात आली खरी, पण त्यामुळे लोकांचा वाढता रोष पाहता त्यांना माफी देखील मागावी लागली आहे. काय आहे नेमके प्रकरण, जाणून घेऊया.
'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट त्याच नावाच्या भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशनवर आधारित आहे. 7 मे रोजी केलेल्या भारतीय लष्कराने या ऑपरेशनद्वारे काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्वस्त केले होते. त्यामुळे या ऑपरेशनवर आधारित चित्रपटाच्या घोषणेनंतर, दिग्दर्शक उत्तम माहेश्वरी यांना ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागला. लोकांनी त्यांना चांगलेच फटकारले. ज्यामुळे या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सोशल मीडियावर जाहीरपणे माफी मागितली आहे. या गंभीर परिस्थितीत कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असे त्यांनी सांगितले.
उत्तम माहेश्वरी यांनी स्टोरीवर लिहिले की, “ऑपरेशन सिंदूरवर आधारित चित्रपटाची घोषणा केल्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा दुखावण्याचा नव्हता. मी आपल्या सैनिकांच्या आणि नेतृत्वाच्या धाडसाने, समर्पणाने आणि सामर्थ्याने भारावून गेलो आहे. मला फक्त ही कथा प्रकाशात आणायची होती. पण, सध्याची वेळ संवेदनशील असल्यामुळे काही लोक अस्वस्थ किंवा दुखावले गेले असतील. तर मी त्यांची मनापासून माफी मागत आहे. हा केवळ एक चित्रपट नाही, तर संपूर्ण देशाची भावना आणि जागतिक स्तरावर देशाची सामाजिक प्रतिमा आहे. आमचे प्रेम आणि प्रार्थना नेहमीच शहीदांच्या कुटुंबांसोबत तसेच सीमेवर रात्रंदिवस लढणाऱ्या सैनिकांसोबत राहतील.'
ऑपरेशन सिंदूर चित्रपटाचे पोस्टर
पोस्टरमध्ये एक महिला सैनिक गणवेश परिधान केलेली आहे आणि तिच्या केसांना सिंदूर लावलेला आहे. तिच्या हातात रायफलही दिसून येते. युद्ध आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, हे पोस्टर धैर्य, त्याग आणि देशभक्ती या विषयांचे चित्रण करते. चित्रपटातील कलाकारांची घोषणा अद्याप करण्यात आली नाही.