
मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. ११ मे रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांमध्ये मेगाब्लॉक परीचालीत करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील व माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी १०.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४८ ते सायंकाळी ४.०८ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते सायंकाळी ४.१० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व पनवेल-वाशी-पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.