Friday, May 9, 2025

विशेष लेखसंपादकीय

जाके मोदी से कह दो? लो, कह दिया!

जाके मोदी से कह दो? लो, कह दिया!

अनिल आठल्ये : निवृत्त कर्नल, अभ्यासक

पाकिस्तानची गाठ पंतप्रधान मोदींशी आहे. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पाकिस्तानबरोबर शांतता निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांची सकारात्मक प्रतिसाद न देणारी तिरकी चाल कायम राहिली. पंतप्रधान मोदी परत पाकिस्तानच्या भूलथापांना बळी पडतील अशी शक्यता आता दिसत नाही. त्यामुळे युद्ध संपले तरी पाकिस्तानवर आर्थिक आणि अन्य दबाब कायम ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे.

१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत-पाकिस्तान दरम्यान कधीच शांतता नांदली नाही. स्वातंत्र्यानंतर महिन्याभरातच पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या आडून काश्मीरवर आक्रमण केले आणि पहिल्या भारत-पाक युद्धाची सुरुवात झाली. त्यानंतर १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये दोन्ही देशांमध्ये उघड युद्धे झाली. परंतु मधल्या काळात शांतता होती असे मुळीच नाही. विशेषत: १९८०-१९९० च्या दशकांमध्ये पाकिस्तानकडून भारतात फार मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले घडवून आणले गेले. यातून भारतातील एकही मोठे शहर वाचले नाही. देशात अनेक बॉम्बस्फोट झाले. दिल्ली, जयपूर, मुंबई, वाराणसी, कोईमतूर, अहमदाबाद अशा अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोटांमध्ये काही हजार लोक तरी मारले गेले असतील. काश्मीर प्रश्न सोडवला न गेल्यामुळे दोन देशांमध्ये तणाव असल्याचे सुरुवातीपासूनच काही पाकिस्तानी आणि त्यांचे भारतातील समर्थक म्हणत राहिले. पण मुंबईवरील २६ नोव्हेंबरचा हल्ला असो वा पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये झालेला बॉम्बस्फोट असो, याचा काश्मीरशी काहीही संबंध नाही. १९८० च्या दशकात झिया उल हक यांच्या काळात पाकिस्तानात इस्लामीकरण केले गेले आणि कडव्या इस्लामला पाकिस्तानचे मुख्य धोरण बनवले गेले. या कडव्या इस्लामच्या मते, प्रेषित मोहंमदांनीच ‘जे लोक भारतावर हल्ला करून त्याला इस्लामी देशात परिवर्तीत करेल ते सरळ स्वर्गात जातील’ असे म्हटल्याचे सांगितले जाते. यालाच ‘गझवा ए हद’ असे म्हणतात. गेली ७० वर्षे पाकिस्तानची वाटचाल याच दिशेने सुरू आहे.

या सर्व कट्टर इस्लामवादाचा परिणाम म्हणूनच २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करण्याची घटना घडली. २०१४ नंतर सत्तेत आलेल्या मोदी सरकारने हा पाकिस्तानी डाव ओळखला आणि आता अशा प्रकारच्या हल्ल्यांसाठी आपण पाकिस्तानलाच जबाबदार धरणार असल्याचे जाहीर केले. १९८० च्या दशकापासून पाकिस्तान अण्वस्त्रयुद्धाचा बागुलबुवा उभा करुन भारताकडून प्रत्युत्तरादाखल होणाऱ्या कारवाईला खीळ घालत आला आहे. त्यामुळे सर्वप्रथम भारत-पाकिस्तान संदर्भात अण्वस्त्रांचे समीकरण काय आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. अणुयुद्धाबद्दल काही शाश्वत नियम आहेत. ते म्हणजे अण्वस्त्रे इतर शस्त्रांपेक्षा अतिशय वेगळी आहेत. त्यामुळे जगात कुठेही अणुयुद्ध झाले तर जगभर किरणोत्सर्ग पसरून गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. या भीतीमुळे जागतिक स्तरावर अण्वस्त्रांचा वापर करायचा नाही तसेच केवळ देशाचे अस्तित्व धोक्यात आले तरच ती वापरायची, अशा प्रकारची धोरणे अवलंबली गेली. त्यामुळे अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये युद्ध झाले तरी ते कधीच निर्णायक होऊ शकत नाही, कारण हरणारा देश अण्वस्त्रवापराची धमकी देऊन आक्रमण थांबवू शकतो. याचबरोबर अण्वस्त्रांविरुद्ध बचावाची काहीच साधने नसणे, हेदेखील वास्तव आहे.

कोणत्याही देशाच्या अण्वस्त्रसज्जतेत तीन मुद्दे महत्त्वाचे असतात. त्यात अणुबॉम्ब आणि ते वाहून नेणारी क्षेपणास्त्रे वा विमाने असणे तसेच एखाद्या राष्ट्राची राजकीय इच्छाशक्ती हे पैलू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. केवळ अणुबॉम्बचा विचार केल्यास भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे प्रत्येकी जवळपास १७० च्या आसपास अणुबॉम्ब आहेत; परंतु पाकिस्तानची अण्वस्त्रे पहिल्यापासूनच परिष्कृत युरेनियमपासून बनवली आहेत. ती आकाराने मोठी आणि एक ते दीड टन वजनाची आहेत. अशी मोठी अण्वस्त्रे क्षेपणास्त्रावर बसवण्यास लागणारे तंत्रज्ञान पाकिस्तानकडे आहे का, याबद्दल दाट शंका आहे. त्यामुळे पाकिस्तान आपली क्षेपणास्त्रे दाखवत असला तरी प्रत्यक्षात अणुबाँब टाकण्यासाठी तो विमानांवरच अवलंबून आहे. क्षेपणास्त्रांविरुद्ध बचावाची प्रणाली निर्माण करणे अत्यंत कठीण आहे. अगदी इस्त्रायलसारख्या देशावरही हमास, सीरिया आणि इराणने क्षेपणास्त्राचा मारा केलेला आहे; परंतु अण्वस्त्र घेऊन जाणारे विमाने थांबवणे वा पाडणे तुलनात्मकदृष्ट्या सोपे आहे. मुख्य म्हणजे पाकिस्तानकडे भारताइतकीच अण्वस्त्रे असली तरी ती लक्ष्यावर पोहोचण्याआधी हवेतच उडवून देण्याची क्षमता भारताकडे आहे.

पाकिस्तान आपली क्षेपणास्त्रे अण्वस्त्रसज्ज असल्याचे म्हणतो तेव्हा खोटे बोलत असतो. इतिहास तपासून पाहिला असता अशी अनेक उदाहरणे दिसून येतात. उदाहरणार्थ १९७१ च्या युद्धात भारताने कराचीवर हल्ला करुन तेथील पेट्रोलच्या साठ्याला आग लावली होती. तेव्हा पाकिस्तानने ती छायाचित्रे मुंबईची आहेत, असे जगाला सांगितले होते. बांगलादेशात शरणागती पत्करण्याच्या दिवसापर्यंत पाकिस्तान आपण युद्ध जकत आहे, असेच जनतेला सांगत होते. त्यामुळे पाकिस्तान याही बाबतीत खोटे बोलत आहे, हे नक्की. पाकिस्तानकडे योग्य तंत्रज्ञान असते तर आत्तापर्यंत भारताप्रमाणे पाकिस्ताननेही आपल्या क्षेपणास्त्राद्वारे अंतरिक्षात ग्रह सोडले असते. आजपर्यंत पाकिस्तानने आपल्या रॉकेटद्वारे उपग्रहाचे प्रक्षेपण केलेले नाही. याउलट, भारताकडे असलेली ‘अग्नी’सारखी क्षेपणास्त्रे पाणबुड्यांवरही लावली आहेत. पाकिस्तान ती नष्ट करु शकत नाही. त्यामुळे अगदी पाकिस्तानने प्रथम अण्वस्त्रे वापरुन हल्ला केला तरीही क्षेपणास्त्राद्वारे प्रतिहल्ला करत पाकिस्तानला पूर्ण बेचिराख करण्याची क्षमता भारताकडे आहे. दोन्ही देशांमधील अण्वस्त्रांच्या संदर्भात हा असमतोल समजून घेण्याची गरज आहे. याची जाण असल्यामुळेच पाकिस्तानसाठी अण्वस्त्रांचा वापर म्हणजे आत्मघाती हल्ला होय.

या सर्व पार्श्वभूमीवर सध्या भारत-पाकिस्तानदरम्यान एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरुन हल्ले केले जात आहेत. मात्र आत्तापर्यंत कोणत्याही देशाने उन्नत प्रतीची क्षेपणास्त्रे एकमेकांविरुद्ध वापरलेली नाहीत. त्यामुळे हे क्षेपणास्त्रांचे युद्ध कवा ड्रोनचा वापर फार काळ चालू शकत नाही. या युद्धामध्ये भारताकडे स्वदेशी बनावटीची विमानभेदी क्षेपणास्त्रे ‘आकाश’ आणि रशियाकडून घेतलेली ‘एस ४००’ ही प्रणाली पाकिस्तानच्या विमानभेदी प्रणालींपेक्षा अनेक पटींनी परिणामकारक आहे. परिणामस्वरुप भारताचे ड्रोन पाकिस्तानात गेले आणि त्यांनी निशाण्यांवर हल्ले केले. मात्र प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने पाठवलेल्या क्षेपणास्त्रे खूप मोठ्या प्रमाणात निकामी करण्यात आपण यशस्वी झालो. त्यातच भारताने कराची बंदराची नाकेबंदी केली. त्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था (जी आधीच डबघाईला आली आहे) आणखीच मरणपंथाला लागण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे आर्थिक आणि सामरिक या दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानवर जबरदस्त दबाव आहे.

भूतकाळाचा विचार केला तर ही ‘गझवा ए हद’ ची घोषणा काही नवी नव्हे. १९४७ मध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानी टोळीवाल्यांनी आपल्या गाड्यांवर ‘चलो दिल्ली’ असे लिहिले होते. अगदी १९७० च्या दशकापर्यंत पाकिस्तानमध्ये एक घोषणा नेहमी दिली जायची, ती म्हणजे ‘हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हदुस्तान’. सर्वसामान्य पाकिस्तान्याला एक पाकिस्तानी दहा हदूंच्या बरोबरचा आहे, असे खरोखरच वाटायचे. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याचे अनेक रणगाडे पकडले गेले. त्यात मिळालेल्या गुप्त दस्तावेजामध्ये पाकिस्तानची तेव्हादेखील दिल्लीपर्यंत जाण्याची योजना असल्याचे दिसून आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान जेव्हा जेव्हा युद्ध झाले आणि त्यात त्यांचा पराजय झाला, तेव्हा तेव्हा पाकिस्तानमध्ये सत्ताबद्दल झाल्याचे दिसले आहे. १९६५ च्या युद्धात काश्मीर घेण्यात अपयश आल्यानंतर अयुब खान यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. १९७१ च्या युद्धानंतर जनरल खान यांचा तक्तापलट झाला. १९९९ मध्ये कारगीलमधील युद्ध हरल्यानंतर नवाज शरीफ यांना हटवण्यात आले. आजपर्यंतची ही परंपरा बघितली तर येत्या काही दिवसांमध्ये आपली कातडी वाचवण्यासाठी पाकिस्तानमध्ये सत्ताबदल होण्याची दाट शक्यता दिसून येते. सध्याचे नामधारी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्याचे प्रमुख (पाकिस्तानचे खरे राजकर्ते) जनरल आसीफ मुनिर या दोघांची उचलबांगडी केली जाऊन इम्रान खान सत्तेत येण्याची दाट शक्यता आहे. भुत्तोंनी १९७२ मध्ये आणि जनरल मुशर्रफ यांनी २००२ मध्ये भारताशी शांततेसाठी बोलणी सुरू केली, त्याप्रमाणेच चर्चेचे गुऱ्हाळ पुन्हा सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

परंतु यावेळी पाकिस्तानची गाठ पंतप्रधान मोदींशी आहे. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पाकिस्तानबरोबर शांतता निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्याचा काहीही परिणाम न होता पाकिस्तानची तिरकी चाल सुरूच राहिली. पंतप्रधान मोदी परत पाकिस्तानच्या भूलथापांना बळी पडतील अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे युद्ध संपले तरी पाकिस्तानवर आर्थिक दबाव आणि पाणीबाणी कायम ठेवली जाईल, अशीच दाट शक्यता आहे.

किस्तानची गाठ पंतप्रधान मोदींशी आहे. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पाकिस्तानबरोबर शांतता निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांची सकारात्मक प्रतिसाद न देणारी तिरकी चाल कायम राहिली. पंतप्रधान मोदी परत पाकिस्तानच्या भूलथापांना बळी पडतील अशी शक्यता आता दिसत नाही. त्यामुळे युद्ध संपले तरी पाकिस्तानवर आर्थिक आणि अन्य दबाब कायम ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment