Monday, May 19, 2025

महत्वाची बातमी

मोदींच्या गुजरातमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, भारताच्या एअर डिफेन्स गनने उडवला धुरळा

मोदींच्या गुजरातमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, भारताच्या एअर डिफेन्स गनने उडवला धुरळा

कच्छ: भारताने दहशतवादविरुद्ध केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तान बिथरला असून, पाकने भारतीय सीमारेषेवरील ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचे हे हल्ले भारत यशस्वीरित्या परतवून लावत आहे. दरम्यान, गुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने एल-७० एअर डिफेन्स गनचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचा सशस्त्र ड्रोन यशस्वीरित्या पाडला असल्याची माहिती संरक्षक अधिकाऱ्यांनी दिली आहे.


जम्मू-काश्मीरपासून पंजाब आणि राजस्थानपर्यंत पाकिस्तानकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी लष्कराने सकाळीच दावा केला आहे की त्यांच्या तीन हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे बिथरलेल्या पाकड्यांनी भारताच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे.



सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न


पाकिस्तान जम्मू-काश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या २४ तासांत पाकिस्तानने २६ ठिकाणी हल्ले केले. यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले आहे. नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी अधूनमधून गोळीबार सुरू आहे.



जालंधर ग्रामीणमधील एका गावातील शेतात ड्रोनचे तुकडे


गुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने एल-७० एअर डिफेन्स गनचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचा एक सशस्त्र ड्रोन यशस्वीरित्या पाडला. दरम्यान, जालंधर ग्रामीणमधील एका गावातील शेतात क्षेपणास्त्राचे तुकडे आढळले. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Comments
Add Comment