
१४ लाखांहून अधिक सदस्य आणि विद्यार्थ्यांना सशस्त्र दल आणि राष्ट्रासोबत एकजुटीने राहण्याचे आवाहन
नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरील कारवाईला पाठिंबा दर्शवत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) या देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक संस्थेने केंद्र सरकार आणि भारतीय लष्करासोबत एकजुटीचा निर्धार व्यक्त केला आहे. आयसीएआय अध्यक्ष सीए चरणजोत सिंग नंदा यांनी सांगितले की, संस्थेचे १४ लाखांहून अधिक सीए सदस्य आणि विद्यार्थी ‘ऑपरेशन सिंदूर’ला केवळ शब्दांतच नव्हे तर कृतीतूनही पाठिंबा देतील.
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आयसीएआयने सीमावर्ती भागात कार्यरत असलेल्या आपल्या शाखांमार्फत मदतकार्य, स्वयंसेवा, औषधे, रुग्णवाहिका सेवा, रक्तदान आणि अन्नदान शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. आयसीएआयच्या १७७ शाखा देशभरात आणि ४७ देशांमध्ये विस्तारल्या आहेत, ज्यातून ते राष्ट्रीय संकटाच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपत आले आहेत.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अपप्रचाराची अर्थात फेक नरेटिव्हची भारताने पत्रकार परिषदेतून पोलखोल केली. पाकिस्तानकडून सतत भारतातील विविध ठिकाणांवर ...
“सीए हे फक्त आर्थिक रक्षक नाहीत, तर राष्ट्रासाठी शक्ती, करुणा आणि लवचिकतेचे आधारस्तंभ आहेत,” असे आयसीएआय उपाध्यक्ष प्रसन्न कुमार डी यांनी सांगितले. संस्थेने मागील युद्ध आणि कोविड काळातही देशसेवा केली असल्याचे उदाहरण देत, यावेळीही "राष्ट्र प्रथम" ही भूमिका घेतली आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ही भारतात चार्टर्ड अकाउंटंट्स व्यवसायाचे नियमन आणि विकास करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा, १९४९ अंतर्गत संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन केलेली जगातील सर्वात मोठी लेखा संस्था आहे. पाच रिजनल कौन्सिलसह (प्रादेशिक परिषद) भारतातील १७७ तसेच ४७ देशांमधील ५२ परदेशी शाखा आणि ३३ प्रतिनिधी कार्यालयांमध्ये मिळून ४० हजारहून अधिक सदस्य असे मोठे नेटवर्क असलेली आयसीएआय ही मानवतावादी प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी अद्वितीयपणे स्थानावर आहे.