बंजाराला स्नेह मिळावा

  37

युवराज अवसरमल


अभिनेते शरद पोंक्षेचा सुपुत्र स्नेह पोंक्षे याने दिग्दर्शनात बाजी मारलेली आहे. ‘बंजारा’ हा त्याने दिग्दर्शित केलेला नवीन चित्रपट येत आहे.


स्नेहचे शालेय शिक्षण बोरिवलीच्या सेंट फ्रान्सिस  शाळेत झाले. शाळेत त्याने स्नेहसंमेलनात भाग घेतला होता. तो डान्स चांगला करायचा. नंतर मिठीबाई कॉलेज मध्ये त्याने शिक्षण घेतले. मास मीडियामध्ये त्याने पदवी घेतली. कॉलेजमध्ये त्याने डान्समध्ये, अभिनयामध्ये भाग घेतला. विश्वास सोहोनी या दिग्दर्शकाकडे त्याने अभिनयाची कार्यशाळा घेतली. त्या दरम्यान त्याचा दिग्दर्शनाकडे कल वाढू लागला. चित्रपट कसा निर्माण  होतो, याची उत्सुकता त्याच्यात निर्माण झाली. त्याने जगभरचे सिनेमे पाहण्यास सुरुवात केली. प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या दिग्दर्शकाचे सिनेमे त्याने पाहिले. लेखनाकडे त्याचा कल वाढू लागला.


त्याने या क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय केला, घरी तसे सांगितले. वडिलांनी त्याला सांगितले की त्याला स्वतःला संघर्ष करावा लागेल. ते त्याला लाँच करू शकत नाही. त्यानंतर सुरुवातीचे सहा महिने तो घरीच बसून होता. त्यानंतर त्याला ग्लिटर नावाची वेबसेरीज मिळाली, त्यामध्ये अभिषेक जावकर या दिग्दर्शकाकडे त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. तेथे ८ ते ९ महिने त्याने काम केले. त्यानंतर त्याच्या वडिलांचे आजारपण, कोविडचा काळ गेला. एका चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले, परंतु  तो चित्रपट बंद पडला. पाच ते सहा महिने काम नव्हते. नंतर हर हर महादेव  हा चित्रपट त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केला. नंतर प्रवीण तरडे या दिग्दर्शकाचे सहाय्यक म्हणून धर्मवीर १ हा चित्रपट केला. आर्ट विभाग सर्व त्याने सांभाळला होता. त्याच दरम्यान त्याने एक मोठा चित्रपट लिहिला. बिग बजेट चित्रपटाचे कथानक असल्याने त्याला दिग्दर्शकाची. संधी मिळेल का याबाबत त्याला शंका होती. अजिंक्य देव या निर्मात्याला एक जाहिराती संदर्भात तो भेटला त्यांनी त्याला एखाद्या मराठी चित्रपटाची  कथा असेल तर देण्याचे सुचविले. मग त्याने रोड ट्रिपवर चित्रपटाचे कथानक लिहिले आणि बंजारा चित्रपटाची निर्मिती झाली. यामध्ये तीन मित्रांची गोष्ट आहे. ते सिक्कीमला जातात, ते का जातात हे चित्रपट पाहिल्यावर कळेल. तेथे गेल्यावर काहीतरी अविस्मरणीय घडलं जे चित्रपटात पहायला मिळेल. सात दिवसात त्याने तो चित्रपट लिहिला. भरत जाधव व सुनील बर्वे यांना जेव्हा कथानक सांगितले गेले तेव्हा त्यांनी स्नेहला खूप कंफर्टेबल केले,त्याच्याशी मित्रत्वाने वागले. बंजारा हा सिक्कीम मधील पूर्णपणे चित्रित झालेला पहिला भारतीय सिनेमा आहे.


मैत्री आणि आत्मशोधाचा सुंदर संदेश देणारा हा बंजारा हा चित्रपट आहे. सिक्कीम येथे या चित्रपटाचे शूटिंग झाले.तिथे ऑक्सिजन खूप कमी असायचा. हवामानाचा काही अंदाज नसायचा. क्षणात उजाडलेले असायचे तर क्षणात पाऊस यायचा. नऊ दिवसाच्या शेड्युलमध्ये बराच पाऊस पडला. सुमारे दीडशेची टीम तो घेऊन गेला होता व शंभराच्यावर तेथील माणसे शूटिंगसाठी घेतली होती. या साऱ्यांना घेऊन  त्या अनपेक्षित वातावरणात  शूटिंग पूर्ण झाले. ‘ बंजारा ‘चित्रपटाचे   प्रेक्षक चांगलेच  स्वागत  करतील अशी  आशा बाळगण्यास काहीच हरकत  नाही.

Comments
Add Comment

राजिंदर नाथ

मराठी नाटकांना हिंदीत नेणारा रंगकर्मी भालचंद्र कुबल : पाचवा वेद गेल्या आठवड्यात अखिल भारतीय नाट्यसृष्टीतील

श्रीमंत भिकाऱ्याची गोष्ट

मनभावन : आसावरी जोशी आज थोड्या वेगळ्या विषयावर बोलावेसे वाटले... बऱ्याच जणांना असे वाटेल की मी हा विषय का निवडला...?

स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा ‘विराट’

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  ‘अवकारिका’ या मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणारा व दक्षिणात्य

एक रंगमंच, दोन दीर्घांक आणि संयुक्त ‘प्रयोग’...

राजरंग : राज चिंचणकर मराठी रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. यात प्रायोगिक रंगभूमीचा वाटा मोठा आहे.

भारतीय नाट्यसृष्टीचे मूळ मोठे करणारे रतन

भालचंद्र कुबल : पाचवा वेद मध्यंतरी एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. त्यात रतन थिय्याम यांचा फोटो

गंगा आली मारुतीरायाच्या भेटीला...

मनभावन : आसावरी जोशी श्रावण महिना सुरू झाला आहे. अनेक पौराणिक कथा या ओलेत्या पाचूच्या दिवसांना अधिकच देखण्या,