
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात!
भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे. नियंत्रण रेषेवर वाढलेली हालचाल, जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी कारवाया आणि त्याला भारतीय हवाई दलाने दिलेले प्रतिउत्तर यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आहे. दोन्ही देश युद्धसज्ज आहेत. अण्वस्त्रांनी सज्ज असलेला शत्रू हलक्यात घेण्याची चूक आता देशासाठी धोकादायक ठरू शकते.
अशा वेळी सामान्य नागरिकांनीही सजग व जागरूक राहणे अत्यावश्यक आहे. युद्ध जर घडलेच, तर ते फक्त सीमारेषेवर लढले जाणार नाही; त्याचा फटका आपल्यापैकी प्रत्येकाला बसू शकतो. म्हणूनच खाली दिलेल्या सूचना गांभीर्याने व कृतीशीलतेने अमलात आणा.
हवाई हल्ल्याच्या वेळी नागरिकांनी काय करावे?
सायरन वाजताच त्वरित सुरक्षित आश्रयस्थळी जा.
जवळचा बंकर किंवा सुरक्षीत बळकट निवारा शोधा.
बंकर उपलब्ध नसेल, तर पक्क्या इमारतीचा बेसमेंट, बाथरूम किंवा जिन्याखाली आसरा घ्या.
वीज आणि गॅसचे कनेक्शन बंद करा.
सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, गॅस सिलिंडर इ. बंद करा – आग लागण्याचा धोका कमी होतो.
खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद करा.
खिडक्यांवर जाड कापड किंवा गाद्या लावा, जेणेकरून काच फुटल्यास इजा होणार नाही.
जमिनीवर तोंड खाली करून झोपा आणि डोकं झाका.
जर तुम्ही उघड्यावर असाल आणि काहीही निवारा नसेल, तर जमिनीवर झोपा आणि डोक्याला पिशवी किंवा हातांनी झाका.
सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.
टीव्ही, रेडिओ किंवा मोबाईलवर सरकारी सूचना आणि अॅलर्ट ऐका व पाळा.
अफवांवर विश्वास ठेवू नका.
फक्त अधिकृत सरकारी स्रोत किंवा विश्वासार्ह न्यूज चॅनल्स वरूनच माहिती घ्या.
संकटाच्या वेळी सज्जता आणि शांतता हेच आपले सर्वात मोठे शस्त्र आहे.
घरातील प्राथमिक सज्जता:
कोरड्या अन्नधान्याचा साठा – १५ दिवस पुरेल इतका शिधा (डाळ, तांदूळ, साखर, बिस्कीट, इ. वस्तू) साठवून ठेवा.
पाणी साठा – किमान ३ दिवस पुरेल इतके पिण्याचे पाणी व २ बादल्या पाणी इतर उपयोगांसाठी ठेवा.
प्रथमोपचार पेटी – सर्व औषधांसह १५ दिवस पुरेल इतकी संपूर्ण औषधे ठेवा.
गॅस सिलिंडर व रेग्युलेटर – वापरत नसल्यास बंद ठेवा, अतिरिक्त सिलिंडर ठेवा.
२५ ते ३० फूट लांबीचा रबरी पाईप घरात ठेवा, पाण्याच्या जोडणीसाठी उपयुक्त.
इंधन साठा – गाडीत किमान २००-२५० किमी प्रवासासाठी पेट्रोल/डिझेल ठेवा.
कॅश साठा – १५ दिवस पुरेल एवढी रोकड जवळ ठेवा. बँक व्यवहार विस्कळीत होऊ शकतात.
ओळखपत्रे आणि कागदपत्रे – आधार, पॅन, विमा, मालमत्ता यांचे कागद एकत्र ठेवा.
नेटवर्क वीज पुरवठा बंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन मोबाईल फुल चार्ज ठेवा.
प्रत्येक कुटुंबीयासाठी ७ दिवस पुरेल अशी छोट्या बॅगा तयार ठेवा – कपडे, औषधे, गरजेच्या वस्तूंसह.
दोन मास्क ठेवा – स्फोटाच्या परिसरात ओलसर करून वापरणे सुरक्षित.
Tixo टेप लावून घराच्या काचांना क्रॉस आकृतीत चिकटवून स्फोटप्रसंगी होणारे तुकडे रोखा.
खिडक्यांवर झाकण्यासाठी तपकिरी कागद, डार्क पडदे तयार ठेवा – काळोखाच्या सूचनेसाठी.
आपत्कालीन प्रसंगांमध्ये वागणूक:
शांतता राखा. कोणतीही हानी किंवा आवाज झाला तरी गोंधळ घालू नका.
रस्त्यांवर अनावश्यक गर्दी करू नका. बचाव पथकांना अडथळा होतो.
सोशल मीडियावर फालतू मेसेज फॉरवर्ड करू नका – मोबाईल नेटवर्क ठप्प होऊ शकते.
सायंकाळचे कार्यक्रम, पार्ट्या तातडीने रद्द करा.
अग्निशमन, जखमींना मदत व सुरक्षित आश्रय मिळविण्याचा छोटासा सराव घरच्या घरी करा.
कॉलम आणि बीमच्या जंक्शन पॉईंट्स ही सुरक्षित जागा मानली जाते – प्रत्येकास त्याचा अभ्यास असावा.
📞 महत्त्वाचे आपत्कालीन क्रमांक:
पोलिस: १००
अग्निशमन दल: १०१
ॲम्ब्युलन्स: १०८
शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा:
युद्ध टाळणे आपल्या हातात नसले तरी, त्यासाठी सज्ज राहणे आपल्या हातात नक्की आहे. प्रत्येक सजग नागरिक हे देशाचे बळ आहे. सजग रहा. सुरक्षित रहा. जबाबदारीने वागा. अफवा पसरवू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका.