मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखीनच वाढला आहे. ज्याचे रूपांतर आता युद्धात झाले असून, भारताच्या अनेक महत्वपूर्ण शहर आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ज्यामध्ये पुण्याच्या दगडू शेठ हलवाई मंदिरा (Dagdusheth Halwai Temple) चा देखील समावेश आहे.
हे मंदिर पुण्यातील सर्वात प्रशस्त आणि मानाचे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर १०० वर्षांहून अधिक जुनं आहे, या मंदिरात दररोज अनेक भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे युद्ध परिस्थिती दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दगडूशेठ मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात
पुण्यातील दगडूशेठ मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. तसेच दंगल नियंत्रण पथक देखील सज्ज करण्यात आले आहेत. भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभुमीवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.