India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!


  • सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला!

  • कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक आऊट

  • लाहोर, कराची, रावळपिंडी, बहावलरपूरपर्यंत भारत घुसला.. भारताने मिसाईल डागले

  • पाकिस्तानवर दुहेरी संकट, बलूच लिब्रेशन आर्मीकडूनही हल्ला

  • बलूच लिब्रेश आर्मीने पाकिस्तानची गॅस पाईपलाईन फोडली


नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सातत्यपूर्ण कुरापतींना अखेर भारताने आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. आज सकाळपासूनच भारताने इस्लामाबाद, कराची, लाहोर, रावळपिंडी, बहावलपूर, सियालकोट आणि पेशावर या सात प्रमुख शहरांवर मिसाईल आणि ड्रोनच्या साह्याने जोरदार हल्ला केला. आयएनएस विक्रांतच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाने कराची पोर्टवर हल्ला करताच पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


भारताच्या तुफानी कारवाईनंतर पाकिस्तान सरकारने संपूर्ण देशात ब्लॅकआऊट लागू केला आहे. इस्लामाबादजवळ पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या स्फोटाने पाक लष्कर हादरले. पाकिस्तानची ५ लढाऊ विमाने पाडण्यात आली असून पाकिस्तानी पायलट भारताकडे ताब्यात असल्याचीही माहिती समोर आली आहे.


दरम्यान, बलूच लिब्रेशन आर्मीनेही पाकिस्तानच्या गॅस पाईपलाईनवर हल्ला करत दुहेरी संकट निर्माण केले आहे. कराचीत १५ ठिकाणी झालेल्या स्फोटांनी परिस्थिती गंभीर बनली असून, भारताने पाकिस्तानच्या AWACS (एअरबोर्न वॉर्निंग सिस्टीम)लाही पंजाबमध्ये निष्प्रभ केले आहे.


पाकिस्तानने भारताच्या जम्मू परिसरात ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रत्युत्तरात भारताने थेट इस्लामाबादवर मिसाईल हल्ला चढवला आहे. सध्या सीमांवर दोन्ही बाजूंनी तीव्र गोळीबार सुरू असून, उरी, कुपवाडा, तंगधारसह सीमावर्ती भागांमध्ये टेन्शन वाढले आहे.


भारताच्या आक्रमणाने पाकिस्तानमध्ये हाहाकार माजला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या संपूर्ण परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत.


दिल्लीतील इंडिया गेट रिकामे करण्यात आले आहे, तर सीमावर्ती राज्यांतील शाळा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.



विशेष मुद्दे:



  • पाकिस्तानमध्ये ब्लॅकआऊट, जनता घाबरली

  • लाहोरवर ड्रोन आणि मिसाईल हल्ला

  • इस्लामाबादजवळ पंतप्रधान निवासस्थानी स्फोट

  • बलूच लिब्रेशन आर्मीचं पाकिस्तानवर दुसरं आक्रमण

  • भारतीय वायुदलाने दोन पाकिस्तानी फायटर जेट्स पाडले

  • दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा – सुरक्षा यंत्रणा अलर्ट

  • सोशल मीडियावर नियंत्रण – ८ हजार पाक समर्थक ट्विटर खाती बंद


ही परिस्थिती युद्धाच्या दारात नेणारी असून, भारताने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही.


दरम्यान, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले असून, आंतरराष्ट्रीय समुदायाने संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. या परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीकडे लक्ष द्यावे आणि अफवांपासून दूर राहावे.

Comments
Add Comment

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी

पाकिस्तानमध्ये टोमॅटो ६०० रुपये किलो, मोफत मिळणारी कोथिंबीरही ५० रुपयांना

इस्लामाबाद : अफगाणिस्तान सोबतच्या संघर्षाचा फटका आता पाकिस्तानला बसू लागला आहे. देशात टोमॅटोच्या किंमती

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! युक्रेन विरूद्ध रशिया युद्धासंबंधी चीनसोबत करणार चर्चा

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

थायलंड  : बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान