Sunday, October 19, 2025
Happy Diwali

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच यूएसएच्या माजी राजदूत निक्की हेली या बाबतीत आपले मत मांडताना पाकिस्तानला कडक शब्दात उत्तर दिले आहे. हेली यांनी भारताच्या या कारवाईला समर्थन देताना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  

निक्की हेलीचे मोठे विधान

संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लेटेस्ट पोस्ट केली आहे, दहशतवाद्यांनी एक हल्ला केला यात डझनहून अधिक भारतीय नागरिक मारले गेले. भारताला प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा आणि स्वत:चा बचाव करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. पाकिस्तानला पीडितेची भूमिका निभावण्याचा अधिकार नाही. कोणताही देश असा दहशतवादी कारवायांना समर्थन देऊ शकत नाही. अशा शब्दत त्यांनी पाकिस्तानला फटकारले आहे. याआधी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानचे घृणास्पद कृत्य अस्याचे म्हटले होते.
Comments
Add Comment