Friday, May 9, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

भारत - पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

भारत - पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया अर्थात आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. आयसीएआय देशातील बारा शहरांमध्ये सीएची परीक्षा घेणार होती. चंदिगड, भुज, जम्मू, श्रीनगर, अमृतसर, भटिंडा, जालंधर, लुधियाना, पठाणकोट, बिकानेर, जोधपूर आणि श्री गंगानगर या शहरांमध्ये होणार असलेली सीएची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, आयसीएआयच्यावतीने सांगण्यात आले.


सध्या सुरू असलेल्या आयसीएआय मे २०२५ च्या परीक्षेचे वेळापत्रक


सीए इंटर


गट १ : ३, ५, ७ मे


गट २ : ९, ११, १४ मे


सीए अंतिम


गट १ : २, ४, ६ मे


गट २ : ८, १०, १३ मे


Comments
Add Comment