
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान इतका चवताळला आहे की त्यांना आपल्या सामान्य नागरिकांचीही चिंता नाही. शुक्रवारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की पाकिस्तानने नागरी विमानांना ढाल बनवत आहे. पाकिस्तान भीषण ड्रोन हल्ले करत होते त्यातच त्यांना दमम ते लाहोर या दरम्यान विमाने सुरू ठेवली. हल्ल्यादरम्यान विमानसेवा सुरू होती यामुळे सामान्य नागरिकांचे नुकसान होत होते. त्यांनी फोटोच्या माध्यमातून पाकिस्तानचा दृष्टपणा उघड केला आहे.
फोटो दाखवत त्यांनी पाकिस्तान आपल्या नागरिकांना मृत्यूच्या दरीत कसे ढकलत आहे हे दाखवले. फोटोद्वारे त्यांनी दमम ते लाहोर पोहोचलेल्या फ्लाईटचे डिटेल्स, वेळ आणि रूटची माहिती दिली होती.
गुरूवारी पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांच्या सैन्य ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने S 400ने सर्व हल्ल्यांना निष्फळ केले. आज परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी गुरूवारच्या घटनाक्रमावर अधिकृत ब्रिफींग दिले.
#WATCH | Delhi: Wing Commander Vyomika Singh says, "...Pakistan did not close its civil airspace despite it launching a failed unprovoked drone and missile attack on 7 May at 08:30 hours in the evening. Pakistan is using civil airliner as a shield, knowing fully well that its… pic.twitter.com/VaTB61Wqr6
— ANI (@ANI) May 9, 2025
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, काल रात्री पाकिस्तानने घुसखोरीचा प्रयत्न केला. सीमेपार ३०० ते ४०० ड्रोनचा वापर करत घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न हाणून पाडला. त्यांनी सांगितले की प्राथमिक तपासानुसार हे समजले की हे ड्रोन तुर्कीचे होते. याला भारतीय लष्कराने संयमाने उत्तर दिले.