
नवी दिल्ली: पाकिस्तानकडून सीमेपार पुन्हा एकदा जोरदार गोळीबार सुरू झाला आहे. उरी सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची घटना समोर आली आहे. येथे पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार केला जात आहे.
भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी तीनही सैन्याध्यक्षांसोबत महत्त्वाची बैठक घेतली जात आहे. या बैठकीत नौदल प्रमुख, हवाईदल प्रमुख आणि लष्कर प्रमुखांसोबत सीडीएसही उपस्थित आहेत. थोड्या वेळाआधी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. या महत्त्वाच्या बैठकीत एनएसए अजित डोवाल यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही बैठकीत सामील होण्यासाठी थोड्या वेळाआधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
पाकिस्तानला न डिवचताही त्यांनी ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला - व्योमिका सिंह
विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे रात्री साडेआठ वाजता पाकिस्तानने भारतावर कोणत्याही कारणाशिवाय ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला. तसेच यानंतर आपल्या नागरी हवाई क्षेत्र बद केले नाही. पाकिस्तानने मुद्दामहून नागरिक विमानांना ढालच्या रूपात वापरले. त्यांना माहीत होते की त्यांनी हल्ला केल्यानंतर भारताकडून तात्काळ एअर डिफेन्सकडून प्रत्युत्तर मिळेल.