
नवी दिल्ली: सीमेपारकडून पाकिस्तानने पुन्हा कुरापती करण्यात सुरूवात केली आहे. पाकिस्तानकडून सीमेलगतच्या भागांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांमध्ये सीमेपलीकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर पाकिस्तानने पूंछ आणि कुपवाडा सेक्टरमध्येही सीमेपलीकडून गोळीबार केला.
अमृतसरच्या ५ विविध भागांमध्ये कमीत कमी १५ ड्रोन दिसले. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील अधिक ड्रोन निष्क्रिय करण्यात आले आहेत. अमृतसरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांच्या येण्याजाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात एकूण ९ पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले. बाडमेरमध्ये कलेक्टरने एक ड्रोन मारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेले ड्रोन भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने निष्क्रिय केले आहेत. निष्क्रिय पाकिस्तानी ड्रोनमधून स्फोटक साहित्य एका घरावर पडले यामुळे आगीचे लोळ उठले. घरात राहणाऱ्यांनी पाणी टाकून आग विझवली.
पाकिस्तानच्या अवंतीपोरा हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. याला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केले. पाकिस्तानचे ड्रोन मारताना १५ ते २० स्फोट ऐकू आले.