Friday, October 24, 2025
Happy Diwali

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला निष्फळ ठरवले आहे. भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम सुदर्शनने या हल्ल्यांना परतून लावले. पाकिस्तानच्या हल्ल्याने भारतातील अनेक शहरांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला होता. भारतीय सुरक्षा रक्षकांनी पाकिस्तानच्या अत्याधुनिक विमान F 16 आणि JF 17 पाडले.

पाकिस्तानचे ५० ड्रोन उद्धवस्त

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या रात्री एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारताच्या अनेक ठिकाणी दणादण अनेक ड्रोन डागण्यात आले. मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून ५० पेक्षा अधिक ड्रोन हवेत मारण्यात आले. L-70 गन, Zu-23mm, शिल्का सिस्टम आणि इतर अॅडव्हान्स हत्यारांनी पाकिस्तानच्या नापाक इराद्यांना उद्ध्वस्त केले.

 

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये पाकिस्तानचा गोळीबार सुरू

गेल्या रात्री पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याने हल्ला सुरू केला आहे. उरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला आहे.

भारतीय लष्कराचे विधान

भारतीय लष्कराने सोशल मिडिया पोस्टमध्ये सांगितले की पाकिस्तानच्या सैन्याने ८ आणि ९ मेच्या दरम्यान रात्री भारताच्या पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांचा वापर करून अनेक हल्ले केले. पाकिस्तानी लष्कराने एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मात्र पाकिस्तानचे हे हल्ले परतून लावले आहे. त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा