
शिर्डी : ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्री साईबाबा मंदिर आणि साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. आज सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह साईबाबा मंदिर आणि शिर्डी विमानतळ या दोन्ही ठिकाणी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि मंदिर सुरक्षा प्रमुख सतीश गोटेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.मंदिराच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली असून, मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची तसेच स्थानिक नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे.

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला. हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा इशारा धमकीच्या ई मेलमधून देण्यात आला ...
परिसरात येणाऱ्या ग्रामस्थांची आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. यासोबतच मंदिरात आणले जाणारे फूल आणि प्रसादाचे साहित्य देखील बारकाईने तपासले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, दिवसभरात अनेक वेळा बॉम्ब शोधक पथकाकडूनही मंदिराच्या परिसराची तपासणी केली जात आहे.
शिर्डी विमानतळावरही याच धर्तीवर सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून बारकाईने निरीक्षण केले जात आहे. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी दोन्ही ठिकाणांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचना दिल्या आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कंबर कसली आहे.